Homeताज्या बातम्याकल्याणीनगर येथील दुकानातून महागडी विदेशी दारू चोरणारे दोघे येरवडा पोलिसांच्या जाळ्यात; २७,२००...

कल्याणीनगर येथील दुकानातून महागडी विदेशी दारू चोरणारे दोघे येरवडा पोलिसांच्या जाळ्यात; २७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

​पुणे:
कल्याणीनगर भागातील एका दुकानातून विदेशी दारूच्या बाटल्यांची चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना येरवडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या २७,२०० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या ६ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
​अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
​रोहन राम कांबळे (वय २८ वर्षे, रा. बी विंग, फ्लॅट नं. १०७, क्रिस्टीन सिटी, बकोरी गाव, ता. हवेली, जि. पुणे)
​अमित महादेव सितापुरे (वय २७ वर्षे, रा. सिद्धार्थनगर, मच्छी मार्केट, येरवडा गाव, पुणे)
​घटना आणि कारवाईचा तपशील
येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार संदीप जायभाये यांना गोपनीय माहिती मिळाली की, जीएसटी (GST) ऑफिसजवळ दोन संशयित इसम थांबले असून त्यांच्याकडे चोरीचे साहित्य असण्याची शक्यता आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कारवाई सुरू केली.
​सह्याद्री हॉस्पिटलकडून जीएसटी ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत संशयास्पद रित्या थांबलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने त्यांच्या जवळील बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी दारूच्या ६ बाटल्या आढळून आल्या. अधिक चौकशीत या बाटल्या त्यांनी कल्याणीनगर येथील ‘टॉनिक आउटलेट’ या दुकानातून चोरल्याची कबुली दिली.
​या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये दाखल गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करून एकूण २७,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करत आहेत.
​तपास पथक
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (मुख्यालय, अतिरिक्त कार्यभार परिमंडळ ०४) श्री. पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्री. सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. केशव धिंडे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार मुकुंद कोकणे, बालाजी सोगे, संदीप जायभाये, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर, शैलेश वाबळे, नटराज सुतार आणि सोमनाथ गायकवाड यांनी ही कामगिरी पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खराडी पोलिसांची धडक कारवाई: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघड; सराईत आरोपी अटकेत

पुणे: पुणे शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय! पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक...

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

error: Content is protected !!