पुणे शहर: काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री बुलेट आणि इतर मोटारसायकलचे सायलेन्सर बदलून फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करत दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी एकूण १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
घटनेची पार्श्वभूमी
दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी रात्री ११.०० वाजेपासून ते दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडनगर चौक, न्याती चौक, रहेस्टा विस्टा चौक, उंड्री आणि महंमदवाडी परिसरात काही तरुणांनी बुलेट व इतर मोटारसायकलच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश फटाक्यांसारखा आवाज करत दहशत निर्माण केली. तसेच धोकादायक पद्धतीने गाड्या चालवल्याचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, आणि घरातील वृद्ध व लहान मुले रात्री घाबरून दचकून उठल्याबाबत नागरिकांनी पोलीस ठाण्यात फोन करून तक्रारी केल्या होत्या.
पोलिसांची कारवाई आणि पथक
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस फौजदार राजस शेख, पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक पुरावे व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती गोळा करून संबंधित दुचाकीस्वार व त्यांच्या सहकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
दाखल करण्यात आलेला गुन्हा
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम २८१, २९२ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १८२ (अ), १९४ (एफ), १९८, १७७, क्रिमिनल लॉAmendment कलम ७ आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम कलम १२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपींची नावे
या कारवाईत पकडण्यात आलेल्या आणि गॅरेजचालक असणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
सुमीत वसंत सगट (वय २० वर्षे, रा. इंदिरानगर, महंमदवाडी, पुणे)
शिवम दिपक जाधव (वय २१ वर्षे, रा. इंदिरानगर, महंमदवाडी, पुणे)
आर्यन जगन्नाथ गायकवाड (वय १९ वर्षे, रा. इंद्रायणीनगर, महंमदवाडी, पुणे)
सार्थक प्रदिप अल्हाट (वय १८ वर्षे, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे)
राज उर्फ यश सागर रणदिवे (वय १९ वर्षे, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे)
तुषार नितीन गायकवाड (वय २१ वर्षे, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे)
धिरज लक्ष्मण गेंजगे (वय २३ वर्षे, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे)
प्रेम सिध्दार्थ गायकवाड (वय १८ वर्षे, रा. गोपाळपट्टी मांजरी, पुणे)
दयानंद रामचंद्र सुतार (वय ५० वर्षे, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, पुणे)
वरद सनी तोडकर (वय १८ वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे)
दिनेश रितेश लांबोटे (वय १९ वर्षे, रा. सुखकर्ता अपार्टमेंट, महंमदवाडी, पुणे)
राजेंद्र सतिश वाघमोडे (वय १८ वर्षे, रा. सुलाई कॉम्प्लेक्स मागे, महंमदवाडी, पुणे)
रवि किसन लोखंडे (वय २० वर्षे, रा. शेल पंपामागे, महंमदवाडी, पुणे)
मॉडीफाईड सायलेन्सर बसवून देणारे गॅरेजचालक:युसूफ फारुख शेख (वय २४ वर्षे, धंदा- गॅरेज व्यवसाय, रा. गल्ली नं. ४, गुलामअली नगर, सय्यदनगर, हडपसर / संतोषीमाता नगर, पुणे)
निखिल फुलाजी सरडे (वय २६ वर्षे, धंदा- गॅरेज व्यवसाय, रा. गल्ली काळेपडळ, हडपसर, पुणे)
रोहन बबलू महापुरे (वय २४ वर्षे, धंदा- गॅरेज व्यवसाय, रा. पोस्टमन कॉलनी, महंमदवाडी, पुणे)
(तसेच, या घटनेत सहभागी असलेल्या इतर मोटारसायकल स्वारांचा शोध सुरू आहे.)
जप्त केलेल्या दुचाकी व मुद्देमाल
वाहन चालकांकडून एकूण ११ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून त्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
बुलेट (क्र. MH ४९ S ८३५६)
बुलेट (विना नंबरप्लेट)
बुलेट (क्र. MH १२ RC ३६७७)
बुलेट (क्र. MH १४ FN ०६३९)
बुलेट (क्र. MH १२ LF ०४०७)
बर्गमॅन (क्र. MH १२ YG ०४१७)
बुलेट (क्र. MH १२ MJ १८२१)
बुलेट (क्र. MH १२ JX २२२७)
बुलेट (क्र. MH १२ GP ३४५०)
बुलेट (क्र. MH १२ JB ५४७६)
बुलेट (क्र. MH १२ KZ ७०८२)
या सर्व मोटारसायकलचे कर्णकर्कश फटाका सायलेन्सर काढून ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले आहेत.
मार्गदर्शक व अधिकारी वर्ग
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त / पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर श्री. जीवन बेनिवाल यांचे मार्गदर्शनखाली, काळेपडळ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गिरीषा निंबाळकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. आण्णासो बाबर यांच्या सूचनांनुसार सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार, सपोफौ राजस शेख आणि पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, अमोल फडतरे, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, लक्ष्मण काळे यांनी पार पाडली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,




















