गंगाधाम चौकात जड वाहनांना बंदी असूनही वाहतूक सुरू – प्रशासन झोपले की कोणाच्या आशीर्वादाने?
पुण्यातील गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना स्पष्टपणे बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात ट्रक, कंटेनर आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वाहतूक सर्रास सुरू आहे. या निष्काळजीपणामुळे आज पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली असून एका निष्पाप नागरिकाचा जीव या अपघातात गेला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
प्रश्न उभा राहतो – ▪️ जर बंदी असताना वाहने धडधडत असतील तर ती कोणाच्या परवानगीने चालतात?
▪️ वाहतूक पोलीस आणि PMC प्रशासन यांची जबाबदारी कुठे आहे?
▪️ वारंवार अपघात होत असतानाही उपाययोजना का नाही?
गंगाधाम चौकातील रस्ते अरुंद असून, शाळा, हॉस्पिटल्स आणि रहिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. तरीही या परिसरातून जड वाहनांना मोकाट सोडल्याने निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी Crime Maharashtra Live News कडून करण्यात येत आहे.
आमची मागणी –
✅ गंगाधाम चौकातून जड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करावी
✅ मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी
✅ संबंधित वाहतूक पोलीस व PMC अधिकारी यांच्यावर कारवाई करावी
✅ सीसीटीव्ही व स्पीड ब्रेकर लावून परिसर सुरक्षित करावा
निष्काळजी प्रशासन आणि ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचे जीव जात असतील, तर याला फक्त अपघात न म्हणता ‘संस्थात्मक हत्याच’ म्हणावी लागेल.
– Crime Maharashtra Live News
—

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.