Homeताज्या बातम्याकोंढवा पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई: अवघ्या ४८ तासांत दोन गुन्हे दाखल, ८...

कोंढवा पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई: अवघ्या ४८ तासांत दोन गुन्हे दाखल, ८ लाखांहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त

पुणे:
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलत अवघ्या ४८ तासांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी एकूण ८ लाखांहून अधिक किमतीचा हायड्रोपोनिक गांजा आणि मेफेड्रॉन (एमडी) हा घातक अंमली पदार्थ जप्त केला असून, दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दोन जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
​प्रकरण १: हायड्रोपोनिक गांजा विक्री प्रकरणी ५.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, अमीर अकबर शेख याच्यावर गुन्हा
​दिनांक ३१/०८/२०२६ रोजी कोंढवा पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी गस्त घालत होते. गस्तीदरम्यान गल्ली नं. ०१, अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द, पुणे येथील एल. के. अपार्टमेन्टसमोरील सार्वजनिक रस्त्यावर एक इसम आपल्या मोपेडसह संशयास्पदरीत्या उभा असलेला दिसून आला.
​पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात हिरवट रंगाचा हायड्रोपोनिक गांजा मिळून आला. त्याच्याकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
१. ५,२१,५००/- रुपये किमतीचा १४९ ग्रॅम हिरवट रंगाचा हायड्रोपोनिक गांजा.
२. ३,३००/- रुपये रोख रक्कम.
३. २५,०००/- रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची व्हेगो गाडी (क्रमांक: एमएच १२ एचएच ८४५३).
४. दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे.
५. लहान व मोठ्या आकाराच्या पारदर्शक रिकाम्या पिशव्या.
(एकुण जप्त माल: ५,४९,८००/- रुपये)
​नमुद इसम अमीर अकबर शेख (वय ३६ वर्षे, रा. फ्लॅट नं. ०३, तिसरा मजला, एल. के. अपार्टमेन्ट, गल्ली नं. ०१, अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द, पुणे) याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
​प्रकरण २: पॅराडाईज इन लॉजमध्ये एमडी ओढणाऱ्या अजीम सलीम शेखवर छापा, २.६४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
​दिनांक २८/०८/२०२६ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील पॅराडाईज इन लॉजमधील रूम नं. ४०५ येथे एक इसम मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ ओढत बसला असल्याची गोपनिय माहिती पोलीस अंमलदार केशव हिरवे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकला.
​सदर ठिकाणी इसम अजीम सलीम शेख (वय ३७ वर्षे, रा. आयाबेसिफा मस्जिदजवळ, कॉलनी नं. १०, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) हा मिळून आला. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
१. २,४२,६००/- रुपये किमतीची १२ ग्रॅम १० मि.ग्रा. मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर.
२. ५,५००/- रुपये रोख रक्कम.
३. १६,०००/- रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन.
४. १५ इन्जेक्शन सिरींज.
(एकुण जप्त माल: २,६४,००۰/- रुपये)
​नमुद आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
​नागरिकांना पोलिसांचे महत्त्वपूर्ण आवाहन:
​कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध अंमली पदार्थ विक्री, बाळगणे व सेवन याविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येत असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास कोंढवा पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा. अंमली पदार्थाची माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे व माहिती पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी कळवले आहे.
​कारवाई करणारे पोलीस पथक:
​सदरची यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र डोके, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, सागर पवार, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, रविंद्र चिप्पा, केशव हिरवे, कारखेले, अमित सुर्यवंशी, रशिद शेख, राहुल रासगे, रियाज पटेल, पुष्पेंद्र चव्हाण, प्रशांत खाडे, शाहिद रजपुत, ओंकार शेटे, रवी जाधव यांनी पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!