Homeताज्या बातम्याखडकी बाजार, दर्गाह वसाहत परिसरातील मशिदीवरील हल्ल्याचा मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनकडून तीव्र...

खडकी बाजार, दर्गाह वसाहत परिसरातील मशिदीवरील हल्ल्याचा मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनकडून तीव्र निषेध; शांतता, बंधुभाव आणि कायद्याच्या राज्याचे पालन करण्याचे आवाहन

खडकी बाजार, दर्गाह वसाहत परिसरातील मशिदीवरील हल्ल्याचा मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनकडून तीव्र निषेध; शांतता, बंधुभाव आणि कायद्याच्या राज्याचे पालन करण्याचे आवाहन

पुणे, दि. २२ जून २०२६:

वाचनालयावरील कारवाईच्या प्रयत्नामुळे आयुक्त सीतल वाकडे संशयाच्या भोऱ्यात; तक्रारी प्रलंबित असताना याच वाचनालयावर ‘विशेष लक्ष’ का? खडकी बाजार येथील दर्गाह वसाहत परिसरातील मशिदीजवळ आज घडलेल्या दगडफेक, तोडफोड आणि परिसरातील शांतता व सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या घटनेचा मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, काही समाजकंटकांनी मशिदीच्या परिसरात गोंधळ निर्माण करून दगडफेक व तोडफोड केल्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यशस्वी झाले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0136/2026 दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 298, 196(2), 190, 191, 324(2) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 135 आणि शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आतापर्यंत किमान ३ ते ४ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. घटनेत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या प्रकरणातील दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नसून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचे संचालक श्री. अन्वर शेख म्हणाले,

“खडकी आणि पुणे शहर हे विविध धर्म, जाती आणि संस्कृतींच्या लोकांनी एकत्र नांदणारे, सामाजिक एकात्मतेचे आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. काही समाजविघातक घटकांनी घडवून आणलेल्या अशा घटना आपल्या सामाजिक ऐक्यावर आघात करणाऱ्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत हिंसा, द्वेष आणि धार्मिक तेढ यांना प्रोत्साहन देता कामा नये. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, मात्र नागरिकांनी संयम राखून शांततेच्या मार्गाने पुढे जावे.”

मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन सर्व नागरिकांना नम्र आवाहन करते की, कोणत्याही अफवा, अप्रमाणित माहिती, भडकाऊ संदेश किंवा सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण पोस्टवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पुढे पाठवू नयेत. कायदा हातात घेण्याऐवजी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे आणि परिसरात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा.

खडकीची ओळख दंगलीची नाही, तर बंधुभावाची आहे. पुण्याची परंपरा द्वेषाची नाही, तर सहजीवन आणि सामाजिक ऐक्याची आहे. काही समाजकंटकांच्या कृत्यांमुळे आपल्या शहराच्या एकतेला तडा जाऊ देऊ नका.

“हिंसेला नकार, शांततेला स्वीकार. द्वेषाला नकार, बंधुभावाला आधार.”

जारीकर्ता :
अन्वर शेख
संचालक, मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन
मो.: 8459167838
ई-मेल: info@missfarhafoundation.org

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा...

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग ​पुणे, दि. १ सप्टेंबर २०२६: माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे...

कोंढवा पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई: अवघ्या ४८ तासांत दोन गुन्हे दाखल, ८ लाखांहून अधिकचे...

पुणे: कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलत अवघ्या ४८ तासांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या धडाकेबाज...

मांजरम बस स्टॉप परिसरात अखेर गतिरोधकाचे काम सुरू; ग्रामस्थांच्या मागणीला यश

नांदेड | दि. १ सप्टेंबर २०२६ : मांजरम बस स्टॉप परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गतिरोधक बसविण्याच्या...

बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र व रोख रक्कम चोऱ्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील ६ महिलांच्या...

पुणे शहरातील बाजारपेठेत गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व रोख रक्कम चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश येथील ६ महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या...

पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या तस्करांकडून ४ लाख ४०...

पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई केली आहे. मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा...

error: Content is protected !!