Homeताज्या बातम्यागणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एरंडवणे भागात दरोड्याच्या तयारीत असलेले ५ आरोपी धारदार हत्यारांसह जेरबंद

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एरंडवणे भागात दरोड्याच्या तयारीत असलेले ५ आरोपी धारदार हत्यारांसह जेरबंद

​गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एरंडवणे भागात दरोड्याच्या तयारीत असलेले ५ आरोपी धारदार हत्यारांसह जेरबंद
​पुणे:
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनपर मोहिमेदरम्यान, डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोड्याच्या तयारी बसलेल्या ५ जणांच्या टोळीला पोलिसांनी धारदार हत्यारांसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई २५ सप्टेंबर २०२६ रोजी एरंडवणे परिसरातील अचानक मित्र मंडळ (चावडी) भागात करण्यात आली.
​घटना कशी घडली?

डेक्कन पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अचानक मित्र मंडळ (चावडी), एरंडवणे येथील गणेश मंदिराच्या मजल्यावर ६ ते ७ इसम धारदार हत्यारे, लाल तिखट आणि इतर साहित्‍य घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत लपून बसले आहेत.
​या माहितीची खात्री करून डेक्कन पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. इमारतीच्या वरील मजल्यावर जाऊन दरवाजा उघडण्यास सांगितले असता, दरवाजा उघडल्यानंतर त्या ठिकाणी ५ संशयित इसम आढळून आले. टेबलवर धारदार हत्यारे, लाल रंगाची चटणी पावडर व दरोड्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य मिळून आले.
​अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
पोलिसांनी घटनास्थळावरून खालील पाच जणांना अटक केली आहे:
१. रितेश गुरुनाथ चिप्पा (वय २५ वर्षे, रा. ५२६, गंजपेठ, महात्मा फुले वाड्यासमोर, समता भूमी, पुणे)
२. विकास नितीन लांबोर (वय १९ वर्षे, रा. प्लॉट नं. १५, संजीवनी हॉस्पिटल जवळ, खिलारेवाडी, पुणे)
३. प्रतिक हनुमंत कांबळे (वय १९ वर्षे, रा. सीडीएस कंपनीजवळ, गणेशनगर, चाळ नं. १०, एरंडवणे, अलंकार, पुणे)
४. प्रतिक रामचंद्र कदम ऊर्फ बाबु (वय २३ वर्षे, रा. प्लॉट नं. १५, संजीवनी हॉस्पिटल जवळ, खिलारेवाडी, पुणे)
५. सुजल मनोज मोरे (वय १९ वर्षे, रा. चाळ नं. ए/३/१८, खोली नं. २०, इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे)
​सदर प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २७८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३१० (४) सह आर्म अॅक्ट, सह म.पो.का. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
​पोलिसांची यशस्वी कामगिरी:
सदरची धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त श्री. कृषिकेश रावळे आणि सहायक पोलीस आयुक्त (विश्रामबाग विभाग) श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रणजितसिंग परदेशी व सपना देवतळे यांच्या सूचनांनुसार डेक्कन पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक योगेश मोरे, अजय भोसले, सहा. पो. फौजदार दत्तात्रय शिंदे, प्रशांत पवार, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर तसेच पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्धकी, धनाजी माळी आणि स्वप्निल गायकवाड यांनी पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय! पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक...

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

बोपोडीतील वादग्रस्त ‘अॅनिमल इन्सिनरेटर’ प्रकल्प: नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आणि तीव्र रोष

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) मनमानी कारभाराचा आणि नियोजनाचा फटका आता पुन्हा एकदा उपनगरांना बसू लागला आहे. बावधन येथील तीव्र विरोधामुळे रखडलेला मृत प्राण्यांच्या दहनाचा प्रकल्प...

error: Content is protected !!