गुटखा विक्री थांबवण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम
पुणे :
शहरात प्रतिबंधित पदार्थांची (गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थ) निर्मिती, साठवणूक, वितरण आणि वाहतूक यावर कठोर कारवाईसाठी पुणे पोलिसांकडून विशेष पावले उचलली जात आहेत.
गुटखा विक्री किंवा साठवणूकबाबत माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित Dial 112 किंवा हेल्पलाईन क्र. 100 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्तालय, पुणे शहर यांनी केले आहे.
महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली (Maharashtra Emergency Response System – Dial 112) अंतर्गत हा हेल्पलाईन क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच औषध प्रशासन विभागाकडे तक्रार नोंदवण्यासाठी 1800222365 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित आहे.
🔴 गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थांबाबत माहिती दिल्यास तातडीने चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
पोलिसांकडून आवाहन :
शहरातील सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांविरुद्ध जागरूक राहावे.
गुटखा विक्री, साठवणूक किंवा वितरणाची माहिती मिळताच तात्काळ Dial 112 किंवा 100 वर कळवावी.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























