पुणे–काळभोर: पुणे जिल्ह्यात वेगवेगळया गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात येत असते. या गुन्हेगारांना जामीनदार होण्यासाठी लोक घाबरतात.त्यामुळे गुन्हेगारांना लायक जामीन मिळत नाही. याचा गैरफायदा घेऊन काही भामट्यांनी न्यायालयातून जामीन मिळवून वकीलांच्या साथीने एक बनावट जामीनदारांचे रॅकेट तयार केले होते. हे रॅकेट गुन्हेगारांच्या नातेवाईकांना हेरुन त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करत असे. तसेच बनावट जामीनदार व कागदपत्रे तयार करून गुन्हेगारांना जामीनावर बाहेर काढत होते. मात्र, आता हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन वकिलांसह ५ जणांना अटक केल्याची माहिती पुणे शहर पोलीस पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.
अॅड. असलम गफुर सय्यद (वय 45, रा. वैदवाडी, हडपसर व अॅड. योगेश सुरेश जाधव (वय 43, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावे आहेत. तर बनावट कागदपत्रे तयार करणारे त्यांचे साथीदार दर्शन अशोक शहा (वय 45 रा. सोलापुर बाजार, कॅम्प, पुणे), पिराजी उर्फ चंद्रकांत मारुती शिंदे (वय. 60, रा. भारतमाता चौक, मोशी, ता. हवेली), गोपाळ पुंडलीक कांगणे (वय. 35, रा. मोरवाडी, पिंपरी कोर्टाचे शेजारी, पिंपरी) व संतोषकुमार शंकर तेलंग यांनाही यापूर्वीच अटक केली आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट बनावट जामीनदारांच्या आधारकार्ड, रेशन कार्ड व ऑनलाईन ७/१२ वरील नावात बदल करून कागदपत्रे तयार करत होते. रेशन कार्ड खरे वाटावे म्हणून त्यावर पुरवठा विभागाच्या उपायुक्तांचा रबरी स्टॅम्प मारुन खोटी सही करीत होते. त्याद्वारे त्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करुन संबंधित कोर्टातील सहाय्यक अधिक्षक (नाझर) यांच्याकडून बनावट कागदपत्रे पडताळणी करुन खरे असल्याचे प्रमाणित करायचे. न्यायालयासमोर जामीनदारांना हजर केल्यावर वकील व बनावट जामीनदार हे खरे असल्याचा आव आणत होते. या प्रकारे ते न्यायालयाची दिशाभुल करुन जेलमधील गुन्हेगारांना जामीन मिळवुन देत होते.
दरम्यान, वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीसांना या बनावट जामीनदारांच्या रॅकेटबाबत गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी ही गोपनीय माहिती पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांना दिली. त्यानंतर शिंदे यांनी एक पथक तयार करून आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या. मिळालेल्या आदेशानुसार पोलिसांच्या पथकाने लष्कर कोर्टाच्या आवारात सापळा रचून संतोषकुमार शंकर तेलंग याच्यासह पाच बनावट जामीनदारांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तर मुख्यआरोपी हा गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला.
या गुन्ह्यातील आरोपींना अटक करुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा दर्शन शहा याच्याकडून बनावट रबरी शिक्के तयार करुन घेत असे. पोलिसांनी शहा याला अटक करत ९ रबरी स्टॅम्प व मशिन जप्त केली. एकेरी पानाचे रेशनकार्ड प्राप्त करुन देणारा पिराजी उर्फ चंद्रकांत मारुती शिंदे व गोपाळ पुंडलीक कांगणे यांना देखील अटक केली आहे. त्यांच्या घराची झडती घेतली असता 89 हजार मुद्देमाल, ९५ संशयित रेशन कार्डसह इतर
या रॅकेटचे मुख्य सुत्रधार अॅड. असलम सय्यद, अॅड. योगेश जाधव व आणखी काही जण असल्याची कबुली संतोषकुमार तेलंग याने न्यायालयात दिली आहे. आरोपींकडून जप्त केलेल्या बनावट रेशनकार्ड /आधारकार्डद्वारे न्यायालयातून कोणकोणत्या आरोपींना आजपर्यंत जामीन मिळाला व त्यासाठी आरोपीस कोणी मदत केली, इत्यादी माहिती न्यायालयाकडून घेण्यात आली आहे. त्यामध्ये न्यायालयातील काही वकीलांचा व कोर्टातील स्टाफचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी अॅड. असलम सय्यद, अॅड. योगेश जाधव यांना अटक केली आहे. पुढील तपास वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धटोणे करीत आहेत.नाजी.

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.