Homeताज्या बातम्यागोटुंबे आखाडा येथे कानाखाली झापड मारल्याचा जाब विचारला असता पती-पत्नीवर हल्ला ;...

गोटुंबे आखाडा येथे कानाखाली झापड मारल्याचा जाब विचारला असता पती-पत्नीवर हल्ला ; पत्नीचा विनयभंग राहुरी पोलिस ठाण्यात दोन भावांविरोधात गुन्हा दाखल

गोटुंबे आखाडा येथे कानाखाली झापड मारल्याचा जाब विचारला असता पती-पत्नीवर हल्ला ; पत्नीचा विनयभंग
राहुरी पोलिस ठाण्यात दोन भावांविरोधात गुन्हा दाखल

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सह संपादक शिवाजी दवणे 9730170965.

राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे कानाखाली झापड मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर हल्ला करून पतीला कुऱ्हाड, लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच पत्नीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे घडली आहे. ही घटना १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी घडली असून, या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोन भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दाम्पत्य राहुरी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पीडित महिला व तिचे पती हे गोटुंबे आखाडा येथील एका रसवंतीवर झाडांना रंग देत होते. त्यावेळी आरोपी राजेंद्र किसन दाभाडे हा तेथे आला व “माझ्या आईला तू शिवीगाळ केली आहेस” असा राग व्यक्त करून पीडित महिलेच्या कानाखाली झापड मारली.

या घटनेचा जाब विचारण्यासाठी दोघे पती-पत्नी आरोपीच्या घरी गेले असता, आरोपी राजेंद्र दाभाडे आणि त्याचा भाऊ भारत दाभाडे या दोघांनी मिळून पीडित महिला व तिच्या पतीस कुऱ्हाड, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. यावेळी त्यांनी महिलेच्या अंगावरील साडी ओढून तिचा ब्लाऊज फाडला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

यानंतर पीडित महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी राजेंद्र किसन दाभाडे व भारत किसन दाभाडे (दोघे रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी) यांच्याविरोधात गुन्हा रजि. नं. ११४०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३ नुसार मारहाण, धमकी व विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. एम. दारकुंडे करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

error: Content is protected !!