Homeताज्या बातम्याचंदननगरमध्ये मारहाण करून मोबाईल पळवणारे तरुण जेरबंद; पुणे पोलिसांची धडक कारवाई

चंदननगरमध्ये मारहाण करून मोबाईल पळवणारे तरुण जेरबंद; पुणे पोलिसांची धडक कारवाई

पुणे:
रस्त्यावरून गाडी नीट चालवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करत जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपींना चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्कुटी आणि चोरीला गेलेला मोबाईल असा एकूण ३८,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​नेमकी घटना काय?
​दिनांक ०९/०६/२०२६ रोजी बोराटे वस्ती, चंदननगर येथील लेन नंबर ०२ मधील वेलकम किराणा स्टोअर्स समोरील रोडवर फिर्यादी यांचे पती भारत गॅसचा सिलेंडर खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथून काळ्या रंगाच्या स्कुटीवरून (नंबर ८०९३) तीन अनोळखी व्यक्ती (दोन मुले आणि एक मुलगी) जात होत्या. या स्कुटीचा फिर्यादीच्या पतीस धक्का लागला.
​त्यांनी गाडी नीट चालवण्याबाबत टोकले असता, याचा राग येऊन गाडीवरील दोन अनोळखी मुलांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर, त्यांच्या जवळील ८,००० रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून ते फरार झाले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गु. र. नं. २८७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११९ (२), ११७ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी निष्पन्न
​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळावरील तसेच आजूबाजूच्या चौकांमधील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. त्यामध्ये गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा पूर्ण नंबर एम. एच. १२ एफ. एस. ८०९३ असल्याचे निष्पन्न झाले.
​गाडीच्या नंबरवरून अधिक तपास केला असता, सदर गुन्हा गाडी मालकाचा मुलगा आणि त्याच्या मित्राने केल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत खालील दोन आरोपींना अटक केली:
१. अनिश संदीप सावंत (वय २० वर्षे, रा. ७/३९, प्रेमनगर, स्टेला मेरी शाळेच्या जवळ, वडगावशेरी, पुणे)
२. वेदांत विजय देशमुख (वय २१ वर्षे, रा. आय. व्ही. इस्टेट, बोटानिका बिल्डिंग डी-१०२, वाघोली, पुणे)
​अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्कुटी आणि जबरदस्तीने काढून घेतलेला मोबाईल असा एकूण ३८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गणेश जगदाळे हे करत आहेत.
​पोलीस पथकाची कामगिरी
​सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. यामध्ये खालील अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले:
​मार्गदर्शक अधिकारी:
​मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर – श्री. मनोज पाटील
​मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०७, पुणे शहर – डॉ. प्रशांत अमृतकर
​मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खराडी विभाग – श्रीमती नुतन पवार
​वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे – श्रीमती अश्विनी जगताप
​पोलीस निरीक्षक (गुन्हे) – श्री. अमोल धस
​तपास पथक:
​सहाय्यक पोलीस निरीक्षक – श्री. गणेश जगदाळे
​कर्मचारी: रमेश मेमाने, अमरसिंग डांगे, विकास कदम, रामदास घावटे, किरण घुटे, ज्ञानोबा लहाणे, चंद्रकांत पाटील आणि सुशील बेंद्रे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडकी बाजार, दर्गाह वसाहत परिसरातील मशिदीवरील हल्ल्याचा मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनकडून तीव्र निषेध; शांतता,...

खडकी बाजार, दर्गाह वसाहत परिसरातील मशिदीवरील हल्ल्याचा मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनकडून तीव्र निषेध; शांतता, बंधुभाव आणि कायद्याच्या राज्याचे पालन करण्याचे आवाहन पुणे, दि. २२ जून...

पुणे महापालिकेत विरोधी नगरसेवकांनी हेल्मेट परिधान करून भाजपची धमकी दिली आहे. पुणे बातम्या

विरोधी नगरसेवक सभागृहात हेल्मेट घालतात पुणे: भाजप सदस्यांच्या “आक्रमक आणि धमकावणाऱ्या” वागणुकीला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) च्या विरोधी नगरसेवकांनी बांधकाम...

HC-नियुक्त प्रशासकाची अवहेलना करण्यावरून AITA अंतरिम पॅनेल कायदेशीर पेचात | पुणे बातम्या

पुणे : अखिल भारतीय टेनिस असोसिएशनची (एआयटीए) अंतरिम कार्यकारी समिती दिल्ली उच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये नियुक्त केलेल्या प्रशासकाला सहकार्य करण्यास नकार दिल्याने कायदेशीर...

पुणे पोलिसांची धडक कारवाई: इन्स्टाग्रामवरून पिस्टल विकणारा सराईत गुन्हेगार लातूरमधून अटक; ५ गावठी पिस्टल...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या खंडणी विरोधी पथक-२ ने एक मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावरून अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: येवलेवाडी परिसरात तब्बल पावणेसात लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह आरोपी जेरबंद!

पुणे: शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पुणे शहराच्या येवलेवाडी पोलिसांनी रंगेहात पकडून जेरबंद केले...

error: Content is protected !!