Homeताज्या बातम्यापुणे मनपातील अतिरिक्त आयुक्त पदे मनपाच्याच अधिकाऱ्यांमधून भरण्यासाठी शासनाने आयुक्तांना आदेश —...

पुणे मनपातील अतिरिक्त आयुक्त पदे मनपाच्याच अधिकाऱ्यांमधून भरण्यासाठी शासनाने आयुक्तांना आदेश — जागरूक नागरिक विकास मंचाच्या पाठपुराव्याला मोठे यश

पुणे मनपा प्रशासनात मोठी घडामोड – अतिरिक्त आयुक्त पदांबाबत शासनाचे आदेश
पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेतील (PMC) अतिरिक्त आयुक्तांची पदे ही मनपातीलच अधिकाऱ्यांमधून भरण्यात यावीत, यासाठी जागरूक नागरिक विकास मंच यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. यासंदर्भात शासनाकडून मनपा आयुक्तांना आदेशित पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
मंचाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनातील स्थानिक अधिकाऱ्यांना न्याय मिळावा, तसेच मनपातील अनुभवी अधिकाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळावी, या मागणीसाठी विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू होता. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिल्याने प्रशासनात समाधान व्यक्त होत आहे.
मंचाचे संस्थापक अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले की, “मनपातील पात्र अधिकाऱ्यांना डावलून बाहेरील नियुक्त्या केल्यास अन्याय होतो. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनाच प्राधान्य मिळावे, ही आमची भूमिका होती. शासनाने त्याची दखल घेतल्याने हा नागरिकांच्या लढ्याचा विजय आहे.”
तसेच, पुणे जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश सावंत, शहर कार्याध्यक्ष उमेर शेख, आणि अनुसूचित जाती-जमाती व पथारी सेलचे शहर अध्यक्ष शंकर ठाकूर यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे मनपातील अधिकाऱ्यांचा मनोबल वाढेल आणि प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम होईल.
दरम्यान, या आदेशानंतर मनपातील अतिरिक्त आयुक्त पदांच्या भरती प्रक्रियेत बदल होण्याची शक्यता असून, स्थानिक अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
— Crime Maharashtra Live News

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोल्ट्री व्यवसाय आणि लग्नाच्या नावाने साडेतीन तोळे सोने लुबाडणारा २ वर्षांपासून फरार आरोपी नवी...

​पुणे: पोल्ट्री व्यवसायाचे आमिष दाखवून आणि घरगुती कार्यक्रमाचे कारण सांगून फिर्यादीच्या पत्नीचे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण घेऊन त्याची मणप्पुरम गोल्ड लोनमध्ये परस्पर विल्हेवाट लावणारा आणि...

पुण्याच्या महिला अंध फुटबॉलपटूंची लवचिकता पडद्यावर पाहायला मिळते

पुणे : इयत्ता नववीत दीपाली कांबळे हिची दृष्टी गेली. तिने तिचे बहुतेक आयुष्य जवळजवळ आठ वर्षे घरामध्ये घालवले, भीती, एकटेपणा आणि नैराश्याने दबून. पुण्याच्या...

उष्मा, तहान, शांतता हा पुण्यातील पक्ष्यांसाठी धोकादायक हंगाम आहे

पुणे : काँक्रीटच्या इमारती, डांबरी रस्ते, दाट नागरी पायाभूत सुविधा आणि लुप्त होत चाललेले वृक्षतोड यामुळे पक्ष्यांना कडक उन्हाळ्यात जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.कबुतरे,...

“स्क्रॅच कार्डपासून मार्केटिंगपर्यंत” — डिजिटल पेमेंट कंपन्यांच्या भविष्यातील धोरणांवर सामाजिक कार्यकर्ते व पुणे पँथर...

“स्क्रॅच कार्डपासून मार्केटिंगपर्यंत” — डिजिटल पेमेंट कंपन्यांच्या भविष्यातील धोरणांवर सामाजिक कार्यकर्ते व पुणे पँथर सेना चे अध्यक्ष सचिन भोसले यांची शंका पुणे : अनेक वर्षांपूर्वी...

जीआर, अंतिम चेतावणी जारी झाल्यानंतर वर्षभरानंतर धर्मादाय रुग्णालयांनी सरकारी योजनांकडे दुर्लक्ष केले

पुणे: शहरातील चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोठ्या खाजगी रुग्णालयांनी 2025 मध्ये आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्य आरोग्य विमा योजना MJPJAY लागू...

error: Content is protected !!