Homeताज्या बातम्यापुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या तस्करांकडून ४...

पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या तस्करांकडून ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई केली आहे. मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा साठा विक्रीकरिता जवळ बाळगणाऱ्या चार जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
​दिनांक २९/०८/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व त्यांचे अधिकारी आणि पथक पुणे शहर हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ए.डी. कॅम्प चौक, खाकसार मस्जिदजवळ काही इसम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नमूद ठिकाणी सापळा रचला.
​ए.डी. कॅम्प चौकाकडून आईना व खाकसार मस्जिदकडे जाणाऱ्या रोडवर, मि. बिलोबो यांच्या वाड्याच्या भिंतीजवळ, नाना पेठ, पुणे येथे पोलिसांनी सातपैकी चार जणांना ताब्यात घेतले.
​ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे व पत्ते:
​१) नासिर रसूल शेख (वय-२२ वर्षे, रा. मोहम्मद अली रोड, गल्ली नं. १४ ए मोहम्मदवाडी, सय्यदनगर, हडपसर, पुणे).
​२) जावेद हसन शेख (वय-२४ वर्षे, रा. गल्ली नं. १८ शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे).
​३) फराज नजिर शेख (वय-२४ वर्षे, रा. गल्ली नं. २८ सय्यदनगर, आशियाना हॉटेलजवळ, हडपसर, पुणे).
​४) तसेच या कारवाईत एक विधिसंघर्षित बालक यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
​आरोपींच्या कब्जातून ७१.८० मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या २,००,००० रुपये किमतीच्या तीन गाड्या आणि २५,००० रुपये किमतीचा एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ४,४०,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​सदर इसमांविरुद्ध समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २९५/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. हसन गौहर, आणि सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-३ श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली; अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांच्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, सहायक पोलीस फौजदार विठ्ठल साळुंखे, आशा भिंगारे, पोलीस अंमलदार मद्देल, अमोल सरडे, क्षीरसागर, साळुंखे, राजे, गुंड व अक्षय शिर्के यांनी पार पाडली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!