पुणे:
पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी सराईत आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांतील सुमारे १५,००,०००/- रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
गुन्ह्याची पार्श्वभूमी व नोंद
या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १७५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला ज्येष्ठ नागरिक या दि. १४/०६/२०२६ रोजी सकाळी ११:३० ते ११:४० वाजेच्या सुमारास पॉवर हाऊस चौक ते भवानी पेठ, पुणे अशा ऑटोरिक्षाने प्रवास करत असताना, ऑटोरिक्षातील चार अनोळखी इसमांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लांबवली होती. या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास आणि आरोपींची निष्पत्ती
मा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल गुन्ह्यातील अज्ञात इसमांचा शोध घेण्यासाठी समर्थ पोलीस स्टेशनचे तपास पथक कार्यरत होते. यादरम्यान तपास पथकाला गोपनिय बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे जळगावचे असून ते वयोवृद्ध इसमांना प्रवासादरम्यान एकांतात गाठून हातचलाखीने त्यांचा किमती ऐवज चोरतात.
या माहितीच्या आधारे तपास पथकाने कसून शोध घेऊन गुन्ह्यातील आरोपींची नावे निष्पन्न केली आणि मुख्य आरोपीला अटक केली:
शाकीर जाकीर तेली (वय २९ वर्षे, रा. संतोष नगर, कात्रज, पुणे) – अटकेची तारीख: दि. ०१/०७/२०२६ रोजी २२:०५ वा.
अटक करण्यात आलेल्या शाकीर तेली याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर साथीदारांची नावे उघड केली. त्यानंतर त्याचे इतर दोन साथीदार पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना मालधक्का चौक, पुणे येथे मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली:
2. मोसीन खान नुर खान (वय ३१ वर्षे, रा. एमएनपी कर्मचारी क्वार्टर, गेंदालाल मील, जळगाव) – अटकेची तारीख: दि. ०२/०९/२०२६ रोजी २०:२५ वा.
3. इस्माईल उर्फ राजु शब्बीर शेख (वय ५० वर्षे, रा. एकता हॉलच्या मागे, जळगाव) – अटकेची तारीख: दि. ०२/०९/२०२६ रोजी २०:२५ वा.
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड हद्दीत अनेक गुन्हे उघड
अटक आरोपींकडे सखोल तपास केला असता, त्यांनी पुणे शहर हद्दीतील सिंहगड रोड, काळेपडळ, वानवडी, बंडगार्डन या ठिकाणी तसेच पिंपरी-चिंचवड भागातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. अटक आरोपींकडून चोरीच्या मालाबाबत तपास करून त्यांच्याकडून सुमारे १५,००,०००/- रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सदर दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अंमलदार शेख हे करत आहेत.
यशस्वी कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार
सदरची ही उल्लेखनीय कामगिरी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने पार पाडली आहे:
मार्गदर्शक अधिकारी:
श्री. राजेश बनसोडे (मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर)
श्री. कृषीकेश रावले (मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१)
श्री. सचिन हिरे (मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग)
श्री. जयंत राजुरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन)
श्री. चेतन मोरे (पोलीस निरीक्षक – गुन्हे, समर्थ पोलीस स्टेशन)
तपास पथक:
श्री. संदिप पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा तपास पथक प्रभारी अधिकारी)
पोलीस अंमलदार: पागार, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, अविनाश दरवडे, चौधरी, यादव.
महिला पोलीस अंमलदार: गंगावणे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























