Homeताज्या बातम्यापुणे पोलिसांची मोठी कारवाई: १ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अजित कसबे...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: १ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अजित कसबे गुन्हे शाखा युनिट-२ कडून जेरबंद

पुणे:
आंबेगाव पोलीस ठाण्यातील एका गंभीर गुन्ह्यात गेल्या एका वर्षापासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट-०२ च्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. अजित सागर कसबे (वय २२, रा. राजीव गांधी वसाहत, चव्हाणनगर, धनकवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
​गुप्त बातमीदाराकडून मिळाली माहिती
दिनांक १२/६/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-२ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार परिमंडळ-०२ च्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते आणि रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेत होते. यादरम्यान पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शिवानंद कायगुडे यांना एका गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. आंबेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. १५८/२०२६ (आर्म ऍक्ट कलम 3(24) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५) मधील पाहिजे असलेला आरोपी अजित सागर कसबे हा स्वामी नारायण मंदिराजवळील सर्व्हिस रोडवर थांबला असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली.
​स्वामी नारायण मंदिराच्या सर्व्हिस रोडवरून अटक
पोलीस अंमलदारांनी तातडीने या बातमीची माहिती युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना दिली. त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार युनिट-२ च्या पथकाने स्वामी नारायण मंदिराजवळील सर्व्हिस रोडवर सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव अजित सागर कसबे असल्याचे कबूल केले. त्याला पुढील कारवाईसाठी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्ह्यात रीतसर अटक करण्यात आली आहे.
​आरोपीवर दाखल असलेले इतर गुन्हे
अटक करण्यात आलेला आरोपी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत:
१. सहकारनगर पोलीस ठाणे (गु.र.नं. ३४४/२०२४): बीएनएस कलम १८९(१), १९१(२), १९०, ३२४, आर्म ऍक्ट 8(24), म.पो.का. ३७(१)(४)(३) सह १३५.
२. सहकारनगर पोलीस ठाणे (गु.र.नं. ४२६/२०२५): बीएनएस कलम १८९(२), ३५२, आर्म ऍक्ट 8(24), म.पो.का. ३७(१)(३) सह १३५.
३. पर्वती पोलीस ठाणे (गु.र.नं. ६८/२०२६): आर्म ऍक्ट 3(24), म.पो.का. ३७(१) सह १३५.
​या पथकाने केली यशस्वी कामगिरी
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गोहर हसन, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली आहे:
​पोलीस निरीक्षक: अश्विनी जगताप
​पोलीस उप-निरीक्षक: ज्ञानेश्वर दवळी
​पोलीस अंमलदार व पथक: उज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे, सर्जेराव सरगर, संजय टकले, शंकर कुंभार, साधना ताम्हाणे, शंकर नेवसे, योगेश मांढरे, नागनाथ राख, विजयकुमार पवार, सददाम तांबोळी, अजीम शेख, विद्या शिंदे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, विशाल दळवी, संदीप शिर्के, ओमकार कुंभार, ऋषिकेश व्यवहारे आणि विनायक वगारे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

KJCOEMR येथे तीन दिवसीय परिषद | पुणे बातम्या

पुणे: IGNITE 2026 ची पहिली आवृत्ती – Innovation and Growth in Next-Gen Intelligent Technology and Engineering, KJ च्या शैक्षणिक संस्था KJ College...

ऑनलाइन शेअर फसवणुकीत कात्रज दुकानदाराचे ६४ लाखांचे नुकसान. पुणे बातम्या

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कात्रज येथील एका ५३ वर्षीय दुकानदाराची ६३.८५ लाख रुपयांची...

मान्सून उशिरा आल्याने राज्यात केवळ १ टक्के पेरण्या पूर्ण : कृषी विभागाचे अधिकारी पुणे...

पुणे : राज्यभरात मान्सून निष्क्रिय राहिल्याने यावर्षी जूनच्या मध्यापर्यंत केवळ 1% खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, भारतीय...

लोहगड किल्ल्यावर दरीत पडून रिअल इस्टेट फर्मच्या संचालकाचा मृत्यू; पुढील महिन्यात त्यांचे लग्न होणार...

पुणे : पिंपरी चिंचवडमधील एका प्रख्यात रिअल इस्टेट फर्मच्या २५ वर्षीय संचालकाचा गुरुवारी सकाळी शहरापासून ५२ किमी अंतरावर असलेल्या लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर...

3 अटक, पुणे ग्रामीण पोलिसांनी 20 गुन्हे उघडकीस आणले. पुणे बातम्या

पुणे ग्रामीण पोलिसांना अटक करण्यात आलेल्या घरफोड्या, दरोडे आणि दरोड्याचे 20 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले, तर आरोपींकडून 25 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे...

error: Content is protected !!