Homeताज्या बातम्यास्नॅपचॅटवर 'प्रिन्सिका' बनून मैत्री, क्रिप्टोमध्ये दीड लाखांची फसवणूक; मुलीच्या आवाजामागचा 'तो' सायबर...

स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका’ बनून मैत्री, क्रिप्टोमध्ये दीड लाखांची फसवणूक; मुलीच्या आवाजामागचा ‘तो’ सायबर पोलिसांच्या ताब्यात

पुणे: पुणे शहर सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं. १०९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलमे ३१९(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी अत्यंत वेगळ्या आणि धक्कादायक पद्धतीने करण्यात आलेल्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे.
​तक्रारदार यांच्या स्नॅपचॅट (Snapchat) खात्यावर “प्रिन्सिका जोशी” नावाच्या मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. सदर रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर तक्रारदार व संबंधित स्नॅपचॅट वापरकर्ता यांच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. त्यानंतर तब्बल सहा ते सात महिने स्नॅपचॅटवर चॅटिंग तसेच मोबाईल फोनवरून नियमित संवाद सुरू होता.
​क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक
या मैत्रीचा विश्वास संपादन केल्यानंतर “प्रिन्सिका जोशी” हिने तक्रारदार यांना क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा व आकर्षक परतावा मिळतो, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी वेळोवेळी त्यांच्या क्रिप्टो वॉलेटमधून (Crypto Wallet) समोरच्या व्यक्तीच्या क्रिप्टो वॉलेटवर १४६८ युएसडीटी (USDT), अंदाजे १,५०,००० रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर केली. मात्र, काही कालावधीनंतर तक्रारदार यांनी Cryptocurrency मध्ये झालेली वाढ, गुंतवणुकीचा परतावा व पैसे परत मिळण्याबाबत वारंवार विचारणा करण्यास सुरुवात केली.
​त्यानंतर “प्रिन्सिका जोशी” या नावाने संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने आपले स्नॅपचॅट व इन्स्टाग्राम अकाउंट बंद केले तसेच संपर्क टाळण्यास सुरुवात केली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी तात्काळ सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे धाव घेतली.
​तांत्रिक तपासातून बंडाळी आणि आरोपी गजाआड
सदर Cryptocurrency फसवणूक गुन्ह्याची पद्धत अत्यंत वेगळी असल्याने सायबर पोलिस स्टेशनच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. स्नॅपचॅट आयडी, मोबाईल क्रमांक तसेच उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले.
​तांत्रिक तपासादरम्यान कुणाल जितेंद्र अदमाने (वय २५ वर्षे, रा. पर्वती परिसर, पुणे) हा मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. मात्र, तपासादरम्यान पोलिसांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता; तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये फसवणूक करणारी व्यक्ती ही ‘प्रिन्सिका जोशी’ नावाची मुलगी असल्याचे नमूद होते, तर तांत्रिक तपासातून ‘कुणाल अदमाने’ नावाच्या पुरुषाचा संबंध समोर येत होता. या विरोधाभासामुळे तपास अधिकच गुंतागुंतीचा झाला असला, तरी सायबर पोलिसांनी ताकदीने तपास करून मुलीच्या आवाजात गळा घालून फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ सायबर चोराला अखेर आपल्या जाळ्यात अडकवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा...

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग ​पुणे, दि. १ सप्टेंबर २०२६: माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे...

कोंढवा पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई: अवघ्या ४८ तासांत दोन गुन्हे दाखल, ८ लाखांहून अधिकचे...

पुणे: कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलत अवघ्या ४८ तासांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या धडाकेबाज...

मांजरम बस स्टॉप परिसरात अखेर गतिरोधकाचे काम सुरू; ग्रामस्थांच्या मागणीला यश

नांदेड | दि. १ सप्टेंबर २०२६ : मांजरम बस स्टॉप परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गतिरोधक बसविण्याच्या...

बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र व रोख रक्कम चोऱ्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील ६ महिलांच्या...

पुणे शहरातील बाजारपेठेत गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व रोख रक्कम चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश येथील ६ महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या...

पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या तस्करांकडून ४ लाख ४०...

पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई केली आहे. मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा...

error: Content is protected !!