Homeताज्या बातम्यापुणे महापालिकेसमोर रस्त्यावरच्या विक्रेत्यांच्या न्यायासाठी उपोषण; विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा

पुणे महापालिकेसमोर रस्त्यावरच्या विक्रेत्यांच्या न्यायासाठी उपोषण; विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा

पुणे महापालिकेसमोर रस्त्यावरच्या विक्रेत्यांच्या न्यायासाठी उपोषण; विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा

पुणे : शहरातील रस्त्यावरचे विक्रेते, फुटपाथ हॉकर्स आणि लघु स्टॉल धारकांना न्याय मिळावा तसेच त्यांच्यावर असलेले दंड-व्याज माफ करून त्यांना दिलासा मिळावा, या मागणीसाठी पुणे महानगरपालिकेसमोर सुरू असलेल्या उपोषणाला आता विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळू लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर पदाधिकारी अथर्व संदीप सोनवणे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शहरातील रोडसाईड विक्रेते व स्टॉल धारकांसाठी Amnesty Scheme (अमय योजना) लागू करण्याची मागणी केली आहे. कोरोनानंतर अनेक छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्यावर दंड व व्याजाचा मोठा बोजा आहे. त्यामुळे अनेकांना नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नागरिकांच्या न्यायासाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांनी सांगितले की, शहरातील हजारो लघु व्यावसायिकांचे उत्पन्न घटले असून त्यांना कायदेशीर चौकटीत व्यवसाय करण्यासाठी शासनाने विशेष सवलत योजना जाहीर करावी.
दरम्यान, जागृत नागरिक विकास मंच या संघटनेने देखील या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे महानगरपालिकेच्या पारदर्शक प्रशासनासाठी आणि नागरिकांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला समाजातील विविध घटकांचा पाठिंबा आहे.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलनकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथेही लेखी पत्र देऊन माहिती दिली आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे पुण्यातील पात्र रस्त्यावरील विक्रेते व स्टॉल धारकांसाठी Amnesty Scheme लागू करून दंड व व्याजामध्ये सवलत द्यावी, तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून द्यावा.
या मागण्या मान्य झाल्यास शहरातील मोठ्या संख्येने हॉकर्स कायदेशीर चौकटीत येतील, महापालिकेचा महसूल वाढेल आणि शहरातील रस्ते व बाजारपेठांमध्ये शिस्त निर्माण होईल, असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे.
सध्या या उपोषणाकडे नागरिक, सामाजिक संघटना आणि प्रशासनाचे लक्ष लागले असून महापालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ट्रेडिंगच्या बहाण्याने १.४० कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला साताऱ्यातून बेड्या

​पुणे: शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषण...

महाराष्ट्र दिनी पुण्यात ‘पर्यावरण’ रणकंदन; ५२९ वारसा वृक्षांच्या कत्तलीविरोधात शेकडो पुणेकर रस्त्यावर

पुणे | १ मे २०२६: एकीकडे संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करत असताना, पुण्यात मात्र पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. गणेशखिंड...

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत. पुणे बातम्या

सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त. पुणे...

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

​पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; पोलीस संचलन मैदानात दिमाखदार संचलन आणि गौरव सोहळा

​पुणे: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवाजीनगर येथील...

error: Content is protected !!