Homeताज्या बातम्यापुणे शहरात विक्रीसाठी आणलेले ४ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त; खंडणी...

पुणे शहरात विक्रीसाठी आणलेले ४ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक १ ची धडक कारवाई

पुणे शहर आयुक्तालयात विनापरवाना शस्त्र बाळगणारे, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याबाबत मा. वरिष्ठांनी स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशानुसार दिनांक २७/०७/२०२६ रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहरकडील सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जण्हाड व पोलीस अंमलदार गस्तीवर असताना, पोलीस अंमलदार सचिन माळवे, सोमनाथ कांबळे तसेच दयानंद तेलंगे यांना गुप्त बातमीदारा मार्फत गोपनीय बातमी मिळाली की, गोकुळनगर, नेंहे (नऱ्हे) पुणे भागात एक इसम बेकायदेशीरपणे पिस्टल विक्रीसाठी आलेला असून त्याच्याकडे ३ ते ४ गावठी पिस्टल आहेत.
​सदर मिळालेली बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक १, श्री. महेश सागडे यांना सांगितल्यानंतर त्यांनी खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली शिताफीने व नियोजनबद्ध पद्धतीने शोध मोहीम राबवून गोकुळनगर, नेंहे, पुणे परिसरातून भुषण उत्तम मोहिते (वय २३ वर्षे, रा. ओम साई ऑर्चिड, फ्लॅट नं. १०६, धायरी पोकळे वस्ती, पुणे) यास ताब्यात घेण्यात आले.
​ताब्यात घेतलेल्या आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ४ गावठी पिस्टल व त्याच्या मॅगझीनमध्ये ३ जिवंत काडतुसे असा एकूण २,००,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीकडे विचारपूस केली असता, त्याने महेश कांबळे (रा. गुजरवाडी, पुणे) याच्याकडून पिस्टल विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
​या प्रकरणी नेंहे पोलीस स्टेशन (नऱ्हे पो.स्टे.) येथे गु.र.नं. १९४/२०२६ नुसार आर्म अॅक्ट कलम ३(२५), ३७(१)(३) सह कलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास नेंहे पोलीस स्टेशन, पुणे शहर करीत आहे.
​कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार:
सदरची यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, मा. सहायक पोलीस आयुक्त १ (गुन्हे शाखा) श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक श्री. महेश सागडे यांच्या सूचनांनुसार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जण्हाड व पोलीस अंमलदार रणजित फडतरे, रहिम शेख, सोमनाथ कांबळे, बाबासाहेब दांगडे, दयानंद तेलंगे पाटील, सचिन माळवे, प्रमोद पवार, किरण मोरे, सुहास जगताप यांनी पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या नियमनाबाबत राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत काम सुरू करणार आहे. पुणे...

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली. पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

error: Content is protected !!