Homeताज्या बातम्यापुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ ची मोठी कारवाई: पिंपरी-चिंचवडमधील फरारी सराईत गुन्हेगार...

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ ची मोठी कारवाई: पिंपरी-चिंचवडमधील फरारी सराईत गुन्हेगार पिस्तूलसह जेरबंद

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ कडील पथकाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील दोन गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या एका सराईत गुन्हेगारास १ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसाह जेरबंद केले आहे. दिनांक २८/०८/२०२६ रोजी युनिट-०६ कडील सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव व स्टाफ युनिट-६ च्या हद्दीत हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते.
​पेट्रोलिंगदरम्यान सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, थेऊर येथील कांबळेवस्ती, म्हसोबा मंदिरामागे मोकळ्या जागेत काळ्या रंगाच्या स्पेंडर गाडीवर एक इसम चेक्सचा फुलबाहु्याचा शर्ट व जिन्स पॅन्ट घालून संशयितरित्या फिरत आहे. सदर इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असून तो पिंपरी व दक्षिण म्हाळुंगे येथील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी आहे. या माहितीची खात्री पटल्यानंतर वरील स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी शिताफीने संशयित इसमाला ताब्यात घेतले.
​चौकशीत त्याने आपले नाव सुशील तानाजी गायकवाड (वय ३९ वर्षे, रा. दत्तनगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:
​गावठी बनावटीचे पिस्टल: १
​जिवंत काडतुसे: ४
​मोबाईल: २
​मोटरसायकल: १
​एकूण जप्त मुद्देमाल: १,२५,४००/- रुपये
​ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३८५/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​सदर यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शेटे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव, सपोफौ ज्ञानेश्वर शिर्के, पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, श्रीकांत पांडुळे, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, अमित सस्ते, नानासाहेब मोरे, प्रशांत कर्णवर, झाकीर पठाण, गणेश माने, अक्षय बांदल, म.सपोफौ अरुणा म्हेत्रे, म. पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, व मनिषा लोखंडे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पर्वती पोलीस ठाण्याची कारवाई: दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तोल बाळगणारा आरोपी जेरबंद

पुणे: पुणे शहर पोलीस दल अंतर्गत पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी पिस्तोल बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या...

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई: तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह दोन सराईत...

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत....

मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण...

पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२६): पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत २५,००,०००/- रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली...

कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई: भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कामगिरी

सविस्तर बातमी: ​पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे. ​दिनांक २३/०७/२०२६...

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

error: Content is protected !!