Homeताज्या बातम्यापुण्यातील मुस्लिम समाजाचा ऐतिहासिक निर्णय ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ जुलूस ५ सप्टेंबर ऐवजी ८...

पुण्यातील मुस्लिम समाजाचा ऐतिहासिक निर्णय ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ जुलूस ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला डीजे वापरास स्पष्ट विरोध : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन शांततेचा संदेश आणि आंतरधर्मीय सौहार्दाला प्राधान्य ✨

पुण्यातील मुस्लिम समाजाचा ऐतिहासिक निर्णय
ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ जुलूस ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला
डीजे वापरास स्पष्ट विरोध : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन शांततेचा संदेश आणि आंतरधर्मीय सौहार्दाला प्राधान्य ✨

पुणे | २६ ऑगस्ट २०२५

५ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे शहरात *गणेश विसर्जनाचे मिरवणुकीचे सोहळे* आणि *ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ* हा महत्त्वाचा धार्मिक उत्सव एकाच दिवशी येत आहे. या दिवशी पुण्यात लाखो गणेशभक्त एकत्र येत असल्याने वाहतूक कोंडी, गर्दी आणि सुरक्षेच्या आव्हानांचा मोठा प्रश्न निर्माण होतो.

या वास्तवाचा विचार करून *पुण्यातील मुस्लिम समाजाने समाजहितासाठी आणि आंतरधर्मीय सौहार्द जपण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय* घेतला आहे:

**ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ चा जुलूस ५ सप्टेंबरऐवजी सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी काढण्यात येईल.**

हा निर्णय म्हणजे :
– पुणे शहरात शांतता, शिस्त आणि भाईचारा टिकविण्याचे आश्वासन,
– दोन धार्मिक सोहळ्यांचा परस्पर *श्रद्धा व परंपरांचा सन्मान*,
– नागरिकांना वाहतुकीच्या अडचणी व गोंधळापासून दिलासा.

*पोलिस प्रशासनास ठाम विनंती*

१. *ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ चा जुलूस हा पूर्णपणे धार्मिक व आध्यात्मिक आहे* – यात नात पठण, कुरआन पठण आणि सद्भावनेचा संदेश दिला जातो.

२. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की *डीजे, प्रचंड आवाजाची साऊंड सिस्टीम* यांना धार्मिक मिरवणुकीत परवानगी नाही.

३. त्यामुळे, जर कुणालाही डीजेचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली, तर ती *सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा थेट अवमान (Contempt of Court)* ठरेल.

*म्हणूनच पुणे पोलिस विभाग आणि मा. जॉईंट कमिशनर श्री. रंजनकुमार शर्मा साहेब* यांना आम्ही आग्रहाची विनंती करतो की, **ईद मिलाद जुलूस केवळ पारंपरिक पठणासहच निघावा, डीजेसाठी कोणतीही परवानगी देऊ नये.**

सौहार्दाचा सामूहिक संदेश
*मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे*,
आम्ही पुणेकर नागरिक व सर्व देशबांधवांना *गणेश उत्सव व ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ* यांच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
चला, पुणे शहर शांततेचे, परंपरेचे व परस्पर आदराचे उदाहरण राहू दे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

error: Content is protected !!