Homeताज्या बातम्याप्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘प्रोटान’ फुंकणार आंदोलनाचे रणशिंग
​पुणे:
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान) संघटनेच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील विविध ज्वलंत प्रश्नांवर आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ जुलै २०२६ रोजी पुणे येथे राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
​या राज्यस्तरीय महा रॅलीला आणि शिक्षण परिषदेला मा. वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा, नवी दिल्ली), मा. सुधाकर अडबाले (शिक्षक आमदार, नागपूर विभाग), डॉ. मगन ससाणे आणि मा. गोरखनाथ वेताळ हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
​तीन टप्प्यांत राज्यव्यापी आंदोलन
​शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या संविधानिक हक्क-अधिकारांसाठी लढणारी ‘प्रोटान’ ही एकमेव बहुजन कर्मचारी संघटना आहे. शासन आणि प्रशासकीय स्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेने तीन टप्प्यांत राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
​पहिला टप्पा (२२ मे २०२६): महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे.
​दुसरा टप्पा (५ जून २०२६): जिल्हा स्तरावर एकदिवसीय धरणे प्रदर्शन आंदोलन करणे.
​तिसरा टप्पा (५ जुलै २०२६): पुणे येथे राज्यस्तरीय महारॅली आणि शिक्षण परिषदेचे आयोजन.
​शासनाच्या धोरणांचा निषेध
सरकार एकीकडे कायदा दुरुस्ती करून सुध्दा अनेक कायदेशीर तरतुदी राखून ठेवते आणि दुसरीकडे त्यांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करते. न्यायालयीन आदेशांच्या अधीन राहून निर्णय घेणे शक्य असतानाही सरकार कर्मचाऱ्यांना न्यायापासून वंचित ठेवत आहे. प्रत्यक्ष न्यायनिवडा झाला तरी समय सीमा अनुल्लेखामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
​’या’ प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष
​प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षण सेवक, विषयतज्ञ आणि CHB तत्त्वावरील प्राध्यापक यांच्या विविध समस्यांवर संघटना नित्य संघर्ष करत आहे. यात प्रामुख्याने:
​वेतन नियुक्ती आणि पदोन्नती
​वेतन आयोग, वरिष्ठ व निवडश्रेणी कायम मान्यता
​पूर्णवेळ मान्यता, समान वेतन आणि किमान वेतन
​CAS प्रक्रिया आणि अतिरिक्त समायोजन
​शाळा-महाविद्यालय बंद करण्याचे धोरण व विद्यापीठ खाजगीकरणाला विरोध
​या अनुषंगाने होणारी कर्मचाऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक थांबवण्यासाठी भविष्यात हा संघर्ष आणखी गतिमान आणि तीव्र करण्यात येणार आहे.
​उपस्थित राहण्याचे आवाहन
​५ जुलै २०२६ रोजी पुणे येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि त्यांच्या मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे नम्र आवाहन प्रोटान जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा...

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग ​पुणे, दि. १ सप्टेंबर २०२६: माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे...

कोंढवा पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई: अवघ्या ४८ तासांत दोन गुन्हे दाखल, ८ लाखांहून अधिकचे...

पुणे: कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलत अवघ्या ४८ तासांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या धडाकेबाज...

मांजरम बस स्टॉप परिसरात अखेर गतिरोधकाचे काम सुरू; ग्रामस्थांच्या मागणीला यश

नांदेड | दि. १ सप्टेंबर २०२६ : मांजरम बस स्टॉप परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गतिरोधक बसविण्याच्या...

बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र व रोख रक्कम चोऱ्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील ६ महिलांच्या...

पुणे शहरातील बाजारपेठेत गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व रोख रक्कम चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश येथील ६ महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या...

पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या तस्करांकडून ४ लाख ४०...

पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई केली आहे. मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा...

error: Content is protected !!