Homeताज्या बातम्याबनावट सोशल मीडिया खात्यांद्वारे तरुणास ब्लॅकमेल करून १.७७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आणि...

बनावट सोशल मीडिया खात्यांद्वारे तरुणास ब्लॅकमेल करून १.७७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोन सायबर आरोपींना बिहारमधून जेरबंद

पुणे:
खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंस्टाग्राम व टेलिग्रामवरील बनावट खात्यांच्या माध्यमातून तरुणाला खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून वारंवार ब्लॅकमेल केले. तसेच त्याच्याकडून १,७७,००० रुपयांची ऑनलाईन खंडणी उकळून त्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोन सायबर आरोपींना पुणे शहर पोलिसांनी बिहार राज्यातून शिताफीने अटक केली आहे.
​घटनेची पार्श्वभूमी व गुन्हा दाखल:
​खराडी पोलीस ठाणे हद्दीतील २२ वर्षीय तरुण फिर्यादी यांचा मुलगा दि. ३०/०९/२०२६ रोजी घरातून निघून गेल्याने खराडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३३५/२०२६, भारतीय न्यायसंहिता (भा.न्या.सं.) कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दि. ०१/१०/२०२६ रोजी सकाळी ०६:३० वाजण्याच्या सुमारास मयत तरुणाने खराडी येथील रिव्हरडेल सूट सोसायटीच्या इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
​या प्रकरणी मयताचे वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलास ‘अजयकुमार भाटिया’ या नावाने फोन करून ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून धमकावण्यात आले व मानसिक त्रास दिल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून खराडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३५६/२०२६, भा.न्या.सं. कलम १०८, ३०८ (६), ३५१ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान यामध्ये आयटी ॲक्ट कलम ६६ (डी), भा.न्या.सं. ६१ (२), २०४ कलमांची वाढ करण्यात आली.
​घटनास्थळ भेट व तांत्रिक तपास:
​गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ ७ चे पोलीस उपआयुक्त श्री. अबिनाश कुमार, गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त श्री. गौहर हसन आणि खराडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री. सुनील दोरगे यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण आणि तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे यांना गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
​तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक श्री. संतोष म्हेत्रे आणि तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार श्री. सुरज जाधव यांनी आरोपींच्या मोबाईल लोकेशन व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी बिहारमधील गोपालगंज व दानापूर (पाटणा) परिसरात असल्याची माहिती निष्पन्न केली.
​बिहारमध्ये सापळा रचून अटक व जप्त मुद्देमाल:
​पोलीस उपनिरीक्षक श्री. संतोष म्हेत्रे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर व गणेश गिरी यांच्या पथकाने दि. २०/१०/२०२६ रोजी पाटणा शहर, बिहार येथे सापळा रचून खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:
१. आकाशकुमार संजय सिंग (वय १८ वर्षे २ महिने, रा. गौरी, ता. कुंठपूर, जि. गोपालगंज, बिहार)
२. राजकुमार संपूर्ण आनंद सिंग (वय २२ वर्षे, रा. बिरण गड, ता. बाराहाट, जि. बांका, बिहार)
​चौकशीत गुन्ह्या Is सहभाग निष्पन्न झाल्याने दि. २१/१०/२०२६ रोजी त्यांना दानापूर पोलीस ठाणे, पाटणा येथे अटक करण्यात आली. आरोपींकडून ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन, १ लॅपटॉप, १ टॅब असा एकूण २,२२,०००/- रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल जप्त करण्यात आला.
​त्यानंतर न्यायालयाकडून ५ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळवून दि. २३/१०/२०२६ रोजी दोन्ही आरोपींना शिवाजीनगर न्यायालय, पुणे येथे हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. ३०/१०/२०२६ पर्यंत ८ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
​गुन्ह्याची कार्यपद्धत (Modus Operandi) आणि आर्थिक तपास:
​वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे व पथकाने केलेल्या तांत्रिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी ‘RVCJ INSTA’ या इंस्टाग्राम पेजला फॉलो करणाऱ्या मुलींच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाती तयार करून मयत शिखर सक्सेना याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यास टेलिग्रामवर बोलावून व्हिडिओ कॉलद्वारे मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून त्याचे रेकॉर्डिंग केले.
​सदर रेकॉर्डिंगच्या आधारे मयतास ब्लॅकमेल करून व ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून ५ वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १,७७,०००/- रुपये ऑनलाईन खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश घुले व सायबर पथकातील पोलीस अंमलदार श्री. विकास लांबकाने, श्री. मयुर गजरमल यांनी मनी ट्रेल तपासून खंडणीच्या रकमेपैकी १,१४,४९८/- रुपये एवढी रक्कम वेळीच होल्ड करण्यात यश मिळवले आहे.
​पुढील तपास व सहकाऱ्यांचा शोध:
​अटक आरोपींच्या चौकशीतून त्यांचा साथीदार अनिकेत गुप्ता (रा. लुधियाना, पंजाब) आणि खंडणीची रक्कम स्वीकारणारे बँक खातेधारक क्रिश कुमार (रा. अरुणाचल प्रदेश) तसेच इतर संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. खराडी पोलीस या गुन्ह्यातील बनावट सोशल मीडिया खाती, बँक खात्यांचे व्यवहार आणि इतर आरोपींच्या सहभागाबाबत अधिक कसून तपास करत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण करीत आहेत.
​पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
​सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट, व्हिडिओ कॉल, तसेच अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची किंवा खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींना नागरिकांनी बळी पडू नये. अशाप्रकारचे ब्लॅकमेलिंग किंवा ऑनलाईन खंडणीची मागणी झाल्यास घाबरून न जाता नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन खराडी पोलिसांनी केले आहे.
​पोलीस पथक व मार्गदर्शन:
​सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोजकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ७) श्री. अबिनाश कुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनखाली खालील अधिकाऱ्यांच्या व अंमलदारांच्या पथकाने केली आहे:
​अधिकारी: वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चंद्रसेन पालकर, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. संतोष म्हेत्रे, सायबर पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश घुले.
​पोलीस अंमलदार: महेश नाणेकर, मनोज खरपुडे, श्रीकांत शेंडे, नवनाथ वाळके, संतोष लवटे, सुरज जाधव, गणेश गिरी, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, विलास केदारी, कमलेश पाटील, अमित छडीदार, महेश बोराडे.
​तांत्रिक मदत विशेष कामगिरी: परिमंडळ ७ कार्यालयातील तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार श्री. सुनील गुंडाळ व श्री. मंगेश शेळके.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंपरी येथील ‘सावली’ निवारा केंद्रात आयुक्तांची अनोखी दिवाळी; बेघर व्यक्तींसोबत साधला आपुलकीचा संवाद!

पिंपरी, ७ नोव्हेंबर २०२६ : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आप्तस्वकीयांसोबत साजरा होणारा जिव्हाळ्याचा सण. मात्र, ज्यांच्या आयुष्यात नात्यांची साथ हरवली आहे आणि ज्यांच्या वाट्याला...

पुणे महानगरपालिकेकडून ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रणाबाबत सक्त आवाहन; फटाक्यांच्या निर्मिती, विक्री व वापरावर...

​पुणे, दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६: पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी पर्यावरण विभाग आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यातर्फे एक महत्त्वाची जाहीर सूचना जारी करण्यात आली...

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू; सुप्रिया सुळे

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू; सुप्रिया सुळे मुंबई, दि.५ (शशिकांत पाटोळे) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क कार्यालयाचेही उत्साहात...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क कार्यालयाचेही उत्साहात उद्घाटन पुणे, औंध-बोपोडी दि.५ (शशिकांत पाटोळे) : केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर...

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न २०० डॉक्टरांची उपस्थिती; डॉ. परवेझ ग्रँट यांना...

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न २०० डॉक्टरांची उपस्थिती; डॉ. परवेझ ग्रँट यांना प्रथम ‘स्वराज्य आरोग्यभूषण पुरस्कार २०२६’ वाघोली : स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा २०२६–२०२८ या...

error: Content is protected !!