Homeताज्या बातम्याबाजारपेठेत गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र व रोख रक्कम चोऱ्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील...

बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र व रोख रक्कम चोऱ्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील ६ महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद

पुणे शहरातील बाजारपेठेत गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व रोख रक्कम चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश येथील ६ महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गजाआड केले आहे.
​लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गु.र.नं. १७३/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०३,३ (५)) आणि गु.र.नं. १७४/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३१९ (४), ३०९, ३ (५)) या गुन्ह्यांचा तपास करत असताना चोरीला गेलेला माल व अनोळखी महिलांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे तसेच पोलीस अंमलदार सुरज ओंबासे, किरण भागीत आणि अतुल जाधव यांनी घटनास्थळासह पुणे शहर व पिंपरी चिंचवड भागातील ५० किलोमीटर परिसरातील १५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले.
​मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने दिनांक २७/०८/२०२६ रोजी संगमवाडी पार्किंग नं. ०३ येथे मध्य प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या खालील ६ महिलांना महिला पोलीस हवालदार साबळे, तळेकर व बनसोडे यांच्या मदतीने ताब्यात घेतले:
​निशा शंतनू सिसोदिया (वय ३० वर्षे, रा. आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे; मूळ पत्ता: कडिया गाव, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
​प्रिया वाईफ ऑप आसिक सिसोदिया (वय ३४ वर्षे, रा. कडिया गाव, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
​पुनम प्रदिप सिसोदिया (वय २७ वर्षे, रा. कडिया गाव, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
​वर्षा कमल सिसोदिया (वय ३५ वर्षे, रा. गुलखेडी, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
​आसना रघुवीर सिसोदिया (वय ३२ वर्षे, रा. गुलखेडी, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
​सोनिका निरोत्तम सिसोदिया (वय ३७ वर्षे, रा. जाटखेडी, गुलखेडी, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
​जप्त मुद्देमाल व उघडकीस आलेले गुन्हे
अटक करण्यात आलेल्या महिलाঁकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि १० मोबाईल फोन असा एकूण ७,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला असून, याद्वारे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास स.पो.नि. दत्तात्रय लिगाडे व पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे करीत आहेत.
​उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे आहेत:
​लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. १७३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५))
​लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. १७४/२०२६, भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३०९, ५)
​विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. ३१६/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२))
​विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. ३१८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२))
​विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. ४०९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२))
​लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. १८५/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२))
​मार्गदर्शन व तपास पथक
सदर यशस्वी कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिषेत्र ०४) श्री. चिलुमुला रजनिकांत, आणि सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्री. सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप, तपास पथकाचे अधिकारी स.पो.नि. निखिल पवार, स.पो.नि. दत्तात्रय लिगाडे तसेच पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे, गणेश लोखंडे, किरण भागीत, मयूर सूर्यवंशी, सुरज ओंबासे, अतुल जाधव, राहुल परदेशी, भीमराव कांबळे, कादिर शेख, अमोल गायकवाड, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, अमोल वायाळ, अक्षय शिंदे, सचिन कुचेकर आणि महिला पोलीस अंमलदार धनश्री साबळे, वर्षा तळेकर, ऐश्वर्या बनसोडे यांनी पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!