पुणे:: सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे वरिष्ठांचे आदेशान्वये स.नगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हयांना प्रतिबंध घालणेचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत बालाजीनगर येथील तुळजाभवानी मंदीराजवळ आले असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक इसम पवार हॉस्पीटल पाठीमागील बजरंग दल चौकाजवळील अर्धवट बांधकाम चालु असलेल्या बिल्डींगचे बाहेरील रोडवर बालाजीनगर पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत थांबला असुन त्याचे कंबरेला पिस्टल सारखे हत्यार लावलेले दिसत आहे.बालाजीनगरमध्ये पवार हॉस्पिटलमागे पिस्टल घेऊन उभ्या असलेल्या तरुणाला पुणे पोलिसांनी पकडले, त्याच्याकडून पिस्टल व तीन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. ऋतीक संजय ननावरे वय २४ वर्षे ,रा.
अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड यांना कळविली असता त्यांनी तपास पथकाचे सपोनि सागर पाटील व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले.
त्यानुसार लागलीच सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपी नामे ऋतीक संजय ननावरे वय २४ वर्षे धंदा काही नाही रा. विजयश्री अपार्टमेंट ए/२ विंग चौथा मजला फ्लॅट नं. १९ पवार हॉस्पीटलमागे बालाजीनगर पुयास ताब्यात घेवुन त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे पँन्टमध्ये खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदरचे ६३,०००/-रु कि.चे एक गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस पंचासमक्ष जप्त करुन त्याचेविरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३८/२०२५ आर्म अॅक्ट क ३(२५) व महा.पो.अधि. क ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार महेश मंडलीक, अमोल पवार किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत, खंडु शिंदे यांनी केली आहे.णे

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















