Homeताज्या बातम्या“बीडीपी झोनमध्ये डोंगर फोड! नियमांचे खुलेआम उल्लंघन टेकड्या फोडून प्लॉटिंगचा खेळ –...

“बीडीपी झोनमध्ये डोंगर फोड! नियमांचे खुलेआम उल्लंघन टेकड्या फोडून प्लॉटिंगचा खेळ – प्रशासन अन बिल्डरांचा अनोखा मेळ- अनंत घरत शिवसेना

“बीडीपी झोनमध्ये डोंगर फोड! नियमांचे खुलेआम उल्लंघन
टेकड्या फोडून प्लॉटिंगचा खेळ – प्रशासन अन बिल्डरांचा अनोखा मेळ- अनंत घरत शिवसेना

पुणे :
पुण्यातील आनंद विहार, हिंगणे खुर्द (सर्वे क्र. २३) परिसरात बेकायदेशीरपणे टेकडी फोडून उत्खनन व प्लॉटिंगचे काम सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सदर ठिकाण बीडीपी झोनमध्ये असून, येथे अनधिकृत पणे एका विकासकाकडून मोठ्या प्रमाणात टेकडी फोडून हजारो ब्रास गौणखनिज (दगड-माती) उत्खनन करून अनधिकृत प्लॉटिंग सुरू असल्याची माहिती पर्यावरण रक्षक व शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी दिली आहे.

श्री. घरत यांनी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन २ कडे दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की, संबंधित व्यक्तीवर यापूर्वीही टेकडी फोडीबाबत सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीदेखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन त्याच ठिकाणी पुन्हा उत्खनन सुरू झाले आहे तरी पुन्हा सदर विषयासंदर्भात पोलिस स्टेशन ला ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

“या अनधिकृत उत्खननामुळे महाराष्ट्र शासनाचा लाखोंचा महसूल तर बुडतोच आहे, पण त्याहून गंभीर म्हणजे पर्यावरणाचा विनाश होत आहे. सदर परिसर बीडीपी झोनमध्ये असून, शेजारी पाचगाव पर्वती व तळजाईचे आरक्षित जंगल आहे. त्यामुळे तेथील वन्यजीव, पक्षी, पशू यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. तसेच डोंगरफोड करताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे,” असे घरत यांनी सांगितले.

श्री. घरत यांनी पुढे म्हटले की, “पुणे हे हरित आणि डोंगराळ शहर म्हणून ओळखले जाते. परंतु अशा बेकायदेशीर डोंगरफोडीमुळे शहराची फुफ्फुसे नष्ट होत आहेत. आणि अनधिकृत प्लॉटिंग चा सुळसुळाट वाढला आहे, सदर ठिकाणी प्रशासनाने तत्काळ गुन्हा दाखल करून उत्खनन थांबवावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू.”

महाराष्ट्रात यापूर्वीही डोंगरफोडीमुळे गंभीर परिणाम झाले आहेत. रायगडच्या तळये गावात २०२१ मध्ये टेकडी फोडी व अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांचा जीव गेला. माळीण (२०१४): या दुर्घटनेत सुमारे १६० लोकांचा मृत्यू झाला होता. इर्शाळवाडी (२०२३): इर्शाळगड किल्ल्याजवळ झालेल्या या दुर्घटनेत २७ लोकांचा मृत्यू झाला आणि ५७ लोक बेपत्ता झाले.
पुण्यातदेखील तळजाई आणि सिंहगड परिसरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या तक्रारी वारंवार येत असून प्रशासनाची निष्क्रियता लक्षात येते.

अनंत घरत यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, “पुण्याच्या हरित क्षेत्राचे व डोंगरांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. डोंगरफोड थांबवण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई करावी.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!