“बीडीपी झोनमध्ये डोंगर फोड! नियमांचे खुलेआम उल्लंघन
टेकड्या फोडून प्लॉटिंगचा खेळ – प्रशासन अन बिल्डरांचा अनोखा मेळ- अनंत घरत शिवसेना
पुणे :
पुण्यातील आनंद विहार, हिंगणे खुर्द (सर्वे क्र. २३) परिसरात बेकायदेशीरपणे टेकडी फोडून उत्खनन व प्लॉटिंगचे काम सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सदर ठिकाण बीडीपी झोनमध्ये असून, येथे अनधिकृत पणे एका विकासकाकडून मोठ्या प्रमाणात टेकडी फोडून हजारो ब्रास गौणखनिज (दगड-माती) उत्खनन करून अनधिकृत प्लॉटिंग सुरू असल्याची माहिती पर्यावरण रक्षक व शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी दिली
आहे.
श्री. घरत यांनी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन २ कडे दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की, संबंधित व्यक्तीवर यापूर्वीही टेकडी फोडीबाबत सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीदेखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन त्याच ठिकाणी पुन्हा उत्खनन सुरू झाले आहे तरी पुन्हा सदर विषयासंदर्भात पोलिस स्टेशन ला ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
“या अनधिकृत उत्खननामुळे महाराष्ट्र शासनाचा लाखोंचा महसूल तर बुडतोच आहे, पण त्याहून गंभीर म्हणजे पर्यावरणाचा विनाश होत आहे. सदर परिसर बीडीपी झोनमध्ये असून, शेजारी पाचगाव पर्वती व तळजाईचे आरक्षित जंगल आहे. त्यामुळे तेथील वन्यजीव, पक्षी, पशू यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. तसेच डोंगरफोड करताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे,” असे घरत यांनी सांगितले.
श्री. घरत यांनी पुढे म्हटले की, “पुणे हे हरित आणि डोंगराळ शहर म्हणून ओळखले जाते. परंतु अशा बेकायदेशीर डोंगरफोडीमुळे शहराची फुफ्फुसे नष्ट होत आहेत. आणि अनधिकृत प्लॉटिंग चा सुळसुळाट वाढला आहे, सदर ठिकाणी प्रशासनाने तत्काळ गुन्हा दाखल करून उत्खनन थांबवावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू.”
⸻
महाराष्ट्रात यापूर्वीही डोंगरफोडीमुळे गंभीर परिणाम झाले आहेत. रायगडच्या तळये गावात २०२१ मध्ये टेकडी फोडी व अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांचा जीव गेला. माळीण (२०१४): या दुर्घटनेत सुमारे १६० लोकांचा मृत्यू झाला होता. इर्शाळवाडी (२०२३): इर्शाळगड किल्ल्याजवळ झालेल्या या दुर्घटनेत २७ लोकांचा मृत्यू झाला आणि ५७ लोक बेपत्ता झाले.
पुण्यातदेखील तळजाई आणि सिंहगड परिसरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या तक्रारी वारंवार येत असून प्रशासनाची निष्क्रियता लक्षात येते.
अनंत घरत यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, “पुण्याच्या हरित क्षेत्राचे व डोंगरांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. डोंगरफोड थांबवण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई करावी.”

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























