बेकायदा देशी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराइतांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली. सराइतांकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले.
गणेश गौतम वाघमारे (वय २८), तेजस काशीनाथ शेलार (वय २५, दोघे रा. सर्व्हे क्रमांक १३०, दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाघमारे आणि शेलार हे सराइत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाघमारे याच्याविरुद्ध पर्वती पोलिसांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईत तो जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडला होता. वाघमारे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून, तो दांडेकर पूल भागात दहशत माजवित असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे, पोलीस शिपाई अमर पवार, मयूर भोकरे यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाघमारे याला पकडले.
वाघमारे याच्याकडे पिस्तुलाबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा माझ्याकडे पिस्तूल आहे. मात्र, ते शेलार याने विकत घेतल्याची माहिती त्याने दिली. प्रतिस्पर्धी टोळीकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने दोघे जण पिस्तूल बाळगतो, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिसांनी शेलार ताब्यात घेतले. शेलार याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तूलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली. दोघांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक अस्मिता लाड, राजेंद्र लांडगे, अमर पवार, मयूर भोकरे, दुर्योधन गुरव, सयाजी चव्हाण, गीतांजली जांभुळकर, प्रवीण ढमाळ, रणजीत फडतरे, लहू सूर्यवंशी, विजय कांबळे यांनी ही कारवाई केली

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,




















