Homeताज्या बातम्याभारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या परराज्यातील दोन तरुणींची सुटका,...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या परराज्यातील दोन तरुणींची सुटका, दलाल गजाआड

पुणे:
पुणे शहर पोलीस दलातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने एका कारवाईत वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या परराज्यातील दोन पीडित तरुणींची सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य दलाल तुकाराम दत्ता मनाळे (वय २२ वर्षे, रा. तीनहत्ती चौक, संभाजीनगर, धनकवडी, पुणे; मूळ गाव- किल्लारी, सरवडी, ता. निलंगा, जि. लातूर) याला अटक केली आहे.
​नेमकी घटना काय?
दिनांक १६ जुलै २०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज परिसरातील ‘किनारा लॉज’मध्ये काही इसम ग्राहकांना व्हॉट्सॲपवरून महिलांचे फोटो पाठवून, वेश्याव्यवसायासाठी मुलींची निवड करायला लावत असल्याचे आणि त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
​पोलीसांचा सापळा आणि कारवाई
मिळालेल्या माहितीच्या आधारे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तत्काळ कारवाईसाठी सापळा रचला. त्यांनी आपल्या पथकातील बनावट ग्राहकांना आरोपींशी संपर्क साधण्यास सांगितले. दलालांनी सांगितल्याप्रमाणे बनावट ग्राहकांना कात्रज येथील किनारा लॉजवर पाठवण्यात आले. ग्राहकांकडून इशारा मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकला. या कारवाईत लॉजमधील एका खोलीतून परराज्यातील दोन पीडित तरुणींची सुखरूप सुटका करण्यात आली.
​आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी पीडित महिलांकडे केलेल्या चौकशीनंतर, दलाल तुकाराम दत्ता मनाळे आणि त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी मुख्य आरोपी तुकाराम मनाळे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
​पोलीस पथकाचे अभिनंदन
ही कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ, पुणे शहर) मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार राहुल शेडगे, सचिन सरपाले, निलेश खैरमोड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, सोनम कामठे आणि श्रद्धा यादव यांच्या विशेष पथकाचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद. पुणे बातम्या

कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार | पुणे बातम्या

पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा. पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले....

एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

error: Content is protected !!