Homeताज्या बातम्यामांजरम बस स्टॉप परिसरात अखेर गतिरोधकाचे काम सुरू; ग्रामस्थांच्या मागणीला यश

मांजरम बस स्टॉप परिसरात अखेर गतिरोधकाचे काम सुरू; ग्रामस्थांच्या मागणीला यश

नांदेड | दि. १ सप्टेंबर २०२६ : मांजरम बस स्टॉप परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गतिरोधक बसविण्याच्या कामाला नायगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) वतीने सुरुवात करण्यात आली आहे. बस स्टॉप परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने येथे अपघाताचा धोका निर्माण होत होता. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती.

या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने भास्कर दिगंबरराव पाटील गायकवाड, मांजरम यांनी नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सविस्तर निवेदन देऊन बस स्टॉप परिसरात गतिरोधक उभारण्याची मागणी केली होती. या मागणीची प्रशासनाने दखल घेत नायगाव PWD विभागाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

बस स्टॉप परिसरातील वाढती वाहतूक आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता गतिरोधकामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण येण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेतही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, गतिरोधकाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत उर्वरित सुरक्षा कामे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे बस स्टॉप परिसरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दल नायगाव PWD विभागाचे अभियंते धाबे साहेब तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे मांजरम ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

“रस्ता सुरक्षा आणि नागरिकांची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिकता असावी. मागणीची दखल घेऊन कामाला सुरुवात झाल्याने समाधान आहे. उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण व्हावे,” अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!