सम्यक क्रांती दलाचे अध्यक्ष निलेश थोरात यांचा आंदोलनाचा इशारा; पोलीस आणि मनपाकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी.
पुणे:
मुंढवा येथील गायरान वस्ती लगत असलेल्या नैसर्गिक ‘कोड्या नाल्यात’ आणि नदीपात्रात गेल्या १५ दिवसांपासून रात्रीच्या अंधारात बेकायदेशीरपणे बांधकामाचा राडारोडा (Debris), माती आणि कचरा डम्पिंग करून नाला बुजविण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे आगामी पावसाळ्यात गायरान वस्तीतील २०० हून अधिक घरांमध्ये पाणी शिरून मोठी जीवित व वित्तहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी ‘सम्यक क्रांती दला’चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. निलेश थोरात यांनी मुंढवा पोलीस स्टेशन आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालय (पुणे मनपा) येथे लेखी तक्रार दाखल करून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दररोज रात्री ११ नंतर जेसीबी आणि हायवा डंपरच्या सहाय्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, नाला बुजवून शेजारील गायरान (शासकीय) जमीन हडप करण्याचा भू-माफियांचा हा मोठा डाव आहे.
कायदेशीर तरतुदी आणि न्यायालयाचा अवमान:
या संदर्भात बोलताना निलेश थोरात म्हणाले, “नदी-नाल्यांमध्ये बेकायदेशीर डम्पिंग करणे हा मुंबई उच्च न्यायालयाच्या (PIL क्र. १३८/२०१८) आदेशाचा थेट अवमान आहे. हे कृत्य भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४(३) – सार्वजनिक जलप्रवाहात अडथळा, कलम २९२ – सार्वजनिक उपद्रव आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १५ अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. महसूल आणि महानगरपालिकेच्या डोळ्यांदेखत हा पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे.”

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.























