Homeताज्या बातम्यामुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर २४ तास वाहतूक ठप्प; अडकलेल्या प्रवाशांना नुकसानभरपाई द्या –...

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर २४ तास वाहतूक ठप्प; अडकलेल्या प्रवाशांना नुकसानभरपाई द्या – मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन

मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे

दिनांक : ५/२/२०२६

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर टँकरमधून झालेल्या धोकादायक गॅस/केमिकल लीकमुळे तब्बल २२ ते २४ तास संपूर्ण वाहतूक ठप्प राहिली. महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या या महामार्गावर एका घटनेमुळे हजारो प्रवासी, महिला, लहान मुले, वृद्ध नागरिक, रुग्ण व कामगार तासन्‌तास अडकून पडले.
ना पिण्याचे पाणी, ना अन्नाची सोय, ना वैद्यकीय मदत. अनेक प्रवासी वाहनांमध्ये अडकून मानसिक तणावात होते. काही रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर अनेक प्रवासी महत्त्वाच्या कामांना मुकले. ही केवळ वाहतूक कोंडी नव्हे, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांवर ओढवलेली मोठी आपत्ती आहे.
मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे.
फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. फराह अन्वर हुसैन शेख यांनी भावना व्यक्त करत सांगितले—
“मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर घडलेली ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. एका टँकरच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे हजारो लोकांचे आयुष्य जवळपास एक दिवस ठप्प झाले. प्रवाशांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या प्रकारे विमानसेवा रद्द झाली किंवा बस अपघात झाला तर प्रवाशांना पर्याय दिला जातो किंवा नुकसानभरपाई मिळते, त्याचप्रमाणे महामार्गावर अडकलेल्या सर्व नागरिकांनाही योग्य नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. ही आमची ठाम मागणी आहे.”
फाउंडेशनचे संचालक अन्वर हुसैन शेख यांनी प्रशासनावर कठोर टीका करत म्हटले—
“लोक तासन्‌तास रस्त्यावर अडकले असताना कुठलीही ठोस मदत पोहोचली नाही, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. जर एखादे विमान तांत्रिक बिघाडामुळे थांबले, रेल्वे उशिरा झाली किंवा बसचा अपघात झाला तर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था आणि काही वेळा नुकसानभरपाई दिली जाते. मग महामार्गावर हजारो लोक अडकून राहिले असताना त्यांच्यासाठी काहीच का नाही? दोषी टँकर चालक, संबंधित कंत्राटदार आणि महामार्ग प्रशासनावर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
फाउंडेशनच्या ठोस मागण्या :
अशा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पर्यायी मार्ग खुले करून वाहतूक सुरळीत करावी.
महामार्गावर कायमस्वरूपी आपत्कालीन मदत केंद्रे, रुग्णवाहिका व मदत पथके उपलब्ध ठेवावीत.
धोकादायक रसायने व गॅस वाहतुकीसाठी अत्यंत कडक सुरक्षा नियम लागू करावेत.
निष्काळजीपणामुळे अडकलेल्या हजारो प्रवाशांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी.
संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
ही घटना प्रशासनासाठी मोठा इशारा आहे. आज दुर्लक्ष केले गेले, तर उद्या याहून मोठे संकट ओढवू शकते. सामान्य नागरिकांचे जीवन व वेळ याची किंमत कमी लेखण्याचा अधिकार कुणालाही नाही.
मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन सरकार, महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाला आवाहन करत आहे की या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व पीडित प्रवाशांना न्याय द्यावा.
संपर्कासाठी :
अन्वर हुसैन शेख
मोबाईल : 8459867838 / 9511696198
ई-म

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडकवासला सर्कल धरणात 24 तासांत 0.50 टीएमसी वाढ झाल्याने शहराची 10 दिवसांची पाण्याची गरज...

पुणे : खडकवासला सर्कलच्या चार धरणांमधील सामूहिक साठा शनिवारी 0.50 टीएमसीने वाढला - शहराची 10 दिवसांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेसा - कारण...

50 हून अधिक झाडे पडण्याची प्रकरणे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंगठ्यावर ठेवतात. पुणे बातम्या

शुक्रवारी रात्री जोरदार वाऱ्याने सेनापती बापट रोडवरील एक मोठे झाड उन्मळून उभ्या असलेल्या कारवर आदळून वाहनाचे नुकसान झाले. पुणे : अविरत पावसाने शनिवारी...

एमएसआरटीसीचे वेळापत्रक नाणेफेकीसाठी जाते कारण पाणी साचणे आणि जाम टोल घेतात; कॅब चालकांना मोजकेच...

पुणे-मुंबई कॉरिडॉर, राज्याच्या सर्वात व्यस्त इंटरसिटी मार्गांपैकी एक, दररोज सुमारे 800 MSRTC ट्रिप पाहतो पुणे : शनिवारी पावसाळ्यात पाणी साचल्याने आणि जाममुळे पुणे-मुंबई...

SIR प्रगणना फॉर्म ऑनलाइन सबमिशन करण्यासाठी अचूक आधार-EPIC डेटा जुळणे अनिवार्य आहे, अधिकारी म्हणतात....

शनिवारी खडकी येथे एसआयआर मोहिमेदरम्यान मतदारांनी फॉर्म भरले आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली. पुणे : विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) 2026 प्रगणना फॉर्म सबमिट...

वरसगाव, पानशेत येथे प्रत्येकी 60 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. पुणे बातम्या

पुणे पावसासाठी सज्ज असल्याचे नागरी संस्थेने वारंवार आश्वासन देऊनही शहरात पावसाच्या सरी पडत आहेत ज्यामुळे पाणी साचले आणि रस्ते वाहून गेले. पुणे :...

error: Content is protected !!