Homeताज्या बातम्यामोबाईल व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या ८ जणांना २४ तासांत अटक; खुनाच्या सुपारीचा...

मोबाईल व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या ८ जणांना २४ तासांत अटक; खुनाच्या सुपारीचा धक्कादायक खुलासा

पुणे:
कोथरूड परिसरातील कर्वे रोडवर एका मोबाईल व्यावसायिकावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीचा पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधारांसह एकूण आठ जणांना २४ तासांच्या आत जेरबंद करण्यात आले असून, अंतर्गत वादातून खुनाची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
​नेमकी घटना काय?
दिनांक १४ जुलै २०२६ रोजी कर्वे रोड, कोथरूड येथे काही हल्लेखोरांनी एका मोबाईल व्यावसायिकावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. १४६/२०२६) दाखल करण्यात आला होता.
​अशी झाली कारवाई
या गुन्ह्याचा समांतर तपास खंडणी विरोधी पथक १ कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) प्रसन्न जऱ्हाड आणि त्यांचे पथक करत होते. तपासादरम्यान पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे आणि रहिम शेख यांना आरोपी सिद्धेश धुमाळ हा घोरपडे उद्यान परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी सिद्धेश नितीन धुमाळ (वय २५, रा. घोरपडे पेठ, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर गुन्ह्यातील इतर साथीदारांची नावे समोर आली.
​त्यानुसार, नागेश उर्फ लाडू राजू मानिके (वय १९, रा. विश्रांतवाडी), राज तुषार धुमाळ (वय १९, रा. एरंडवणे) आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
​खुनाच्या सुपारीचा कट उघड
अधिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, फिर्यादीसोबत असलेल्या अंतर्गत वादामुळे खालील तीन इसमांनी या हल्ल्याची व खुनाच्या गुन्ह्याची सुपारी दिली होती:
१. प्रसाद सुभाष मारणे (वय ३१, रा. कोथरूड)
२. आदित्य अश्विनीकुमार डाके (वय २८, रा. कोथरूड)
३. मेघराज ज्ञानेश्वर बारंगळे (वय ३५, रा. नऱ्हे)
​या सर्वांना अटक करण्यात आली असून, खंडणी विरोधी पथकाने या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास केला आहे.
​मार्गदर्शन आणि कारवाई करणारी टीम
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा १) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​तपास पथकात खंडणी विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक महेश सागडे, युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सपोनि प्रसन्न जऱ्हाड, सपोनि नानासाहेब कदम आणि पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, दुर्योधन गुरव, रहिम शेख, सोमनाथ कांबळे, बाबासाहेब दांगडे, दयानंद तेलंगे पाटील, सचिन माळवे, नितीन कांबळे, मयुर भोकरे, किरण मोरे, नितीन बोराटे, सुहास जगताप, मुकुंद तारू, अतुल साठे, हानीफ शेख, अमित बोरडे, किशोर शिंदे व पुरुषोत्तम गुनला यांचा समावेश होता.
​—

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद. पुणे बातम्या

कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार | पुणे बातम्या

पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा. पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले....

एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

error: Content is protected !!