वानवडी येथे वाढदिवसानिमित्त सामाजिक शिविर व सन्मान सोहळा संपन्न
पुणे (वानवडी) | प्रतिनिधी
दि. 23/12/2025 रोजी श्रीमंत महादजी शिंदे चौक, आयडीबीआय बँकजवळ, आर्या कॅफे समोर, वानवडी येथे श्री समीरभाऊ शेंडकर व श्री ओंमकारभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत शिविराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
या कार्यक्रमास पंजेतन पवित्र संघटना व पंजेतन पवित्र महिला संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री हनिफभाई शेख, महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. श्री मतीनभाई मदार तसेच महिला संघटनेच्या कार्यकर्त्या नसरीन सरफराज शेख, सना अल्ताफ शेख, फलक निसार शेख व फिजा अल्ताफ शेख यांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमात श्री समीरभाऊ शेंडकर यांना पंजेतन पवित्र संघटनेच्या वतीने प्रशस्तीपत्र व मानसम्मान देऊन गौरविण्यात आले. तसेच श्री ओंमकारभाऊ यांचाही सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नसरीन सरफराज शेख, सना अल्ताफ शेख, फलक अल्ताफ शेख व कु. फिजा अल्ताफ शेख यांचे विशेष योगदान लाभले. परिसरातील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























