Homeताज्या बातम्यावाकडीत भरदिवसा घरफोडी! सोन्याचे दागिने, रोकड अन् मोबाईल चोरीला घर बंद असल्याची...

वाकडीत भरदिवसा घरफोडी! सोन्याचे दागिने, रोकड अन् मोबाईल चोरीला घर बंद असल्याची संधी साधत लोखंडी कपाट फोडले; ६७ हजारांचा ऐवज लंपास

वाकडी : घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्याने थेट लोखंडी कपाटालाच लक्ष्य केले. कपाट उचकटून त्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा तब्बल ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना परंडा तालुक्यातील वाकडी येथे भरदिवसा घडली. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, किसन धनाजी लोहार याच्याविरुद्ध परंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लताबाई सुनील लोहार (वय ४५, रा. वाकडी) या २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत घराबाहेर होत्या. याच कालावधीत आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उचकटले आणि कपाटातील मौल्यवान ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या चोरीमध्ये १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील झुमके, ४ हजार रुपये किमतीच्या लहान मुलाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, २८ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे मणी-मंगळसूत्र, २० हजार रुपये रोख रक्कम आणि ३ हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा मोबाईल असा एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

घरातील कपाट उचकटून दागिने आणि रोकड लंपास केल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी लताबाई लोहार यांनी २६ नोव्हेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किसन धनाजी लोहार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाराते करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरमाळ्यातील ‘चंद्रकांत स्टील वर्क्स’मध्ये वारंवार चोऱ्या; सीसीटीव्ही फुटेज व पुराव्यांसह कारवाईची मागणी

येरमाळा (ता. कळंब, जि. धाराशिव): येरमाळा येथील येडशी रोडवरील पेट्रोल पंपासमोरील 'चंद्रकांत स्टील वर्क्स' या दुकानात जानेवारी २०२५ पासून ते जुलै २०२६ पर्यंत वारंवार...

मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सेवाकार्याचा जागर! रक्तदान, आरोग्यदान आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी...

मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सेवाकार्याचा जागर! रक्तदान, आरोग्यदान आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य मदत; भाजप वैद्यकीय आघाडीचा सक्रिय सहभाग वाघोली, प्रसाद सोनवणे,तालुका प्रतिनिधी,पुणे. : केंद्रीय...

औंधमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

औंधमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा पुणे (औंध), दि. २६ (प्रतिनिधी : शशिकांत पाटोळे) : ७७ वा भारतीय संविधान दिन औंध येथे...

कोंढव्यातील वनक्षेत्रातील कथित बेकायदा वृक्षतोडीविरोधात आंदोलनाला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा!

पुणे : कोंढवा परिसरातील वनक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात छेडण्यात आलेल्या आंदोलनाला 'रुग्ण हक्क संघर्ष समिती'ने आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील मंदार किवळे हल्लाप्रकरण: ६ आरोपी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील मंदार किवळे हल्लाप्रकरण: ६ आरोपी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई पुणे; दि. २६ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात बुधवारी (२५ नोव्हेंबर...

error: Content is protected !!