Homeताज्या बातम्या“PMC अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप; ‘न्यायाधीश’ असल्याचा आव आणणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी!”

“PMC अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप; ‘न्यायाधीश’ असल्याचा आव आणणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी!”

पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहाय्यक आयुक्त अशोक भवारी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सामान्य नागरिक आणि पथारी व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप जागरूक नागरिक विकास मंच, महाराष्ट्र राज्य यांनी केला आहे.
मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी नागरिकांशी संवाद साधताना स्वतःला न्यायाधीश असल्याचा भास निर्माण करत असून, एकतर्फी निर्णय घेत असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे. यामुळे लहान व्यावसायिक, पथारी धारक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे मंचाने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर मंचाकडून लवकरच पुणे महानगरपालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच, अतिक्रमण कारवाई करताना नियमांचे पालन, पारदर्शकता आणि मानवी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
मंचाचे पुणे जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश सावंत, शहर कार्याध्यक्ष उमेर शेख, तसेच अनुसूचित जाती-जमाती व पथारी सेलचे शहर अध्यक्ष शंकर ठाकूर यांनी एकत्रितपणे ही भूमिका मांडली. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल.
दरम्यान, या आरोपांबाबत मनपा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून, आयुक्तांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या महिला अंध फुटबॉलपटूंची लवचिकता पडद्यावर पाहायला मिळते

पुणे : इयत्ता नववीत दीपाली कांबळे हिची दृष्टी गेली. तिने तिचे बहुतेक आयुष्य जवळजवळ आठ वर्षे घरामध्ये घालवले, भीती, एकटेपणा आणि नैराश्याने दबून. पुण्याच्या...

उष्मा, तहान, शांतता हा पुण्यातील पक्ष्यांसाठी धोकादायक हंगाम आहे

पुणे : काँक्रीटच्या इमारती, डांबरी रस्ते, दाट नागरी पायाभूत सुविधा आणि लुप्त होत चाललेले वृक्षतोड यामुळे पक्ष्यांना कडक उन्हाळ्यात जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.कबुतरे,...

“स्क्रॅच कार्डपासून मार्केटिंगपर्यंत” — डिजिटल पेमेंट कंपन्यांच्या भविष्यातील धोरणांवर सामाजिक कार्यकर्ते व पुणे पँथर...

“स्क्रॅच कार्डपासून मार्केटिंगपर्यंत” — डिजिटल पेमेंट कंपन्यांच्या भविष्यातील धोरणांवर सामाजिक कार्यकर्ते व पुणे पँथर सेना चे अध्यक्ष सचिन भोसले यांची शंका पुणे : अनेक वर्षांपूर्वी...

जीआर, अंतिम चेतावणी जारी झाल्यानंतर वर्षभरानंतर धर्मादाय रुग्णालयांनी सरकारी योजनांकडे दुर्लक्ष केले

पुणे: शहरातील चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोठ्या खाजगी रुग्णालयांनी 2025 मध्ये आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्य आरोग्य विमा योजना MJPJAY लागू...

उच्च किमतीच्या अपेक्षेने डिजिटल सोन्याद्वारे सूक्ष्म-गुंतवणूक

पुणे: यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल सोन्यात सूक्ष्म गुंतवणूक वाढू लागली असून पिवळ्या धातूच्या किमती 10 ग्रॅम प्रति 10,000 रुपयांनी वाढल्या आहेत.उंड्री येथील रहिवासी सक्षम सिंह...

error: Content is protected !!