Homeताज्या बातम्याशिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी
​शिक्रापूर / पुणे :
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या व सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे (वय २७ वर्षे, रा. चाकण रोड, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) या धोकादायक सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए – MPDA) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यास ताब्यात घेऊन अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
​पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये मागील ५ वर्षांत संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधील जामिनावर मुक्त झालेले आरोपी व त्यांच्यावर नव्याने दाखल गुन्ह्यांचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी दिले होते. त्यानुसार दरोडा, जबरी चोरी, महामार्गावरील लूटमार, खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले होते.
​आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत खालीलप्रमाणे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत:
​संगनमत करून घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवून शिवीगाळ व दमदाटी करणे.
​संगनमत करून खून व खुनाचा प्रयत्न करणे.
​संगनमत करून जबरी चोरी करणे व जबरी चोरीचा माल विक्री करणे.
​संगनमत करून घातक हत्यारांनी दुखापत पोहोचवून अन्यायाची आगळीक करणे.
​दुखापत, हल्ला किंवा गैरपणे परिरोध करण्याची पूर्वतयारी करून गृहअतिक्रमण करणे व दमदाटी करणे.
​आरोपीवर जुना भारतीय दंड विधान प्रकरण १६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे प्रकरण ६ व १७, तसेच भारतीय हत्यार कायदा १९५९ चे प्रकरण ५ अंतर्गत गुन्हे नोंद आहेत.
​कारवाईची प्रक्रिया
आरोपी सराईत व धोकादायक असल्याने तत्कालीन प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अधीक्षक मा. संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे एमपीडीएचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षकांच्या अवलोकनानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला.
​पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी ‘महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्स, वाळू तस्कर, काळा बाजार करणारे, बेकायदेशीर जुगार/लॉटरी चालवणारे व मानवी अपव्यापार प्रतिबंधक मुख्य अधिनियम १९८१ (सुधारणा अधिनियम २०२५ चा महा. अधि. क्र. २९)’ अन्वये आदेश (क्रमांक: पगम/एम पी डि ए/एस आर/१६/०१/२०२६, दि. २०/०८/२०२६) पारित केला.
​त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शोध घेऊन सुरज ऊर्फ मोन्या देडगे याला दि. २३/०८/२०२६ रोजी ताब्यात घेतले आणि मध्यवर्ती कारागृह अकोला येथे स्थानबद्ध केले.
​कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
सदरची कामगिरी खालील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वी केली:
​मार्गदर्शन: मा. श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा. शुभम कुमार (अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग), मा. रवींद्र भोसले (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर उपविभाग).
​तपास व अंमलबजावणी पथक: श्री. प्रमोद क्षीरसागर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण), श्री. चंद्रशेखर यादव (पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस स्टेशन), श्री. उमाकांत कुंजीर (पोलीस उपनिरीक्षक), जितेंद्र पानसरे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक), महेश बनकर (सहा. पोलीस उपनिरीक्षक).
​अंमलदार: स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण (शिरूर विभाग पथक) तसेच पोलीस हवा. रोहिदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे आणि पोलीस अंमलदार नारायण वाळके (शिक्रापूर पोलीस स्टेशन).

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

कोथरूड पोलिसांची धडक कारवाई: विक्रीसाठी आणलेली २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह एकास अटक;...

​पुणे: कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे असा...

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बेळगावातून अटक; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

​पुणे: गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव (कर्नाटक) येथून जेरबंद केले आहे. राजश्री राजेश तुडयेकर...

हातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल...

पुणे: लोहगाव परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच...

error: Content is protected !!