Homeताज्या बातम्याशिक्षण प्रसारक मंडळीला नोंदणी व मुद्रांक विभाग आणि पुणे महापालिकेच्या नोटिसा; होर्डिंग...

शिक्षण प्रसारक मंडळीला नोंदणी व मुद्रांक विभाग आणि पुणे महापालिकेच्या नोटिसा; होर्डिंग करारप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू

शिक्षण प्रसारक मंडळीला नोंदणी व मुद्रांक विभाग आणि पुणे महापालिकेच्या नोटिसा; होर्डिंग करारप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू

पुणे | प्रतिनिधी

पुणे शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या होर्डिंग करारप्रकरणी गंभीर अनियमितता समोर आली असून, या प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने तसेच पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने संस्थेला नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईमुळे संबंधित प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी या प्रकरणी नोंदणी व मुद्रांक विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि पुणे महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, शिक्षण प्रसारक मंडळीने टिळक रोड येथील एस. पी. कॉलेज परिसरात उभारण्यात आलेल्या सहा जाहिरात फलकांसाठी सिद्धिविनायक अॅडव्हर्टायझिंग कंपनीसोबत सन २०२१ मध्ये तब्बल ७२ महिन्यांचा करार केला. मात्र, हा करार नोंदणीकृत करण्याऐवजी केवळ नोटराइज करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, संबंधित करार करताना शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालय, नोंदणी व मुद्रांक विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची दिशाभूल करून परवानग्या मिळविण्यात आल्या. त्यामुळे शासनाचा महसूल बुडविणे व संबंधित कायद्यांचे उल्लंघन झाल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

या तक्रारीची दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने संबंधितांना नोटीस बजावली असून, नोंदणी व मुद्रांक विभागानेही शासनाची फसवणूक झाल्याबाबत खुलासा मागवत नोटीस जारी केली आहे. दोन्ही विभागांनी शिक्षण प्रसारक मंडळीला सात दिवसांच्या आत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या संदर्भात बोलताना तक्रारदार सागर धाडवे म्हणाले, “शिक्षण प्रसारक मंडळीसारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून शासनाची दिशाभूल होणे अत्यंत गंभीर बाब आहे. नियमांना बगल देऊन करार करण्यात आला असेल तर संबंधित संस्था आणि कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अन्यथा आम्ही न्यायालयीन लढा उभारण्याबरोबरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासही मागे हटणार नाही.”

या प्रकरणाकडे शिक्षण क्षेत्रासह प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, संबंधित विभागांच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या तस्करांकडून ४ लाख ४०...

पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई केली आहे. मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा...

पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची धडक कारवाई: मेफेड्रॉन बाळगणारा...

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई करत मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा साठा विक्रीसाठी...

पर्वती पोलीस ठाण्याची कारवाई: दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तोल बाळगणारा आरोपी जेरबंद

पुणे: पुणे शहर पोलीस दल अंतर्गत पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी पिस्तोल बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या...

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ ची मोठी कारवाई: पिंपरी-चिंचवडमधील फरारी सराईत गुन्हेगार पिस्तूलसह जेरबंद

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ कडील पथकाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील दोन गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या एका सराईत गुन्हेगारास १ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसाह...

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई: तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह दोन सराईत...

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत....

error: Content is protected !!