शिवशाही व्यापारी संघाच्या महिला आघाडीच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी सौ. भाग्यश्री भंडारे यांची नियुक्ती
पिंपरी –
शिवशाही व्यापारी संघाच्या महिला आघाडीच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी सौ. भाग्यश्री विजय भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.
पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शिवाजीराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपनेत्या सौ. उषामाई कांबळे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झाली आहे.
नवीन नियुक्तीप्रसंगी सौ. भाग्यश्री भंडारे यांनी सांगितले की, “सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग व माता-भगिनींचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
लोकसेवक युवराज दाखले यांनी त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















