सोनेई येथे दलित तरुणावरील खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
सोनेई (ता. नेवासा) येथे झालेल्या हिंदू मातंग दलित तरुणावरील खुनी हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आज, दि. 28 ऑक्टोबर 2025 रोजी, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली सोनेई पोलिस स्टेशनवर न्याय मागणी निषेध मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर व सुजाता आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या मोर्चामध्ये विविध आंबेडकरी संघटनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
मोर्चात आर.पी. आय., पीपल्स रिपब्लिकन पार्टी, लहुजी सेना, सत्यशोधक लहुजी सेना, आंबेडकरी संघटना व मातंग संघटना, विराट प्रतिष्ठाण, लहुजी शक्ती सेना यांसह इतर घटक संघटनांनी सहभाग नोंदविला.
मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष किसन चव्हाण, महाराष्ट्र उपाध्यक्ष आबा जाधव, एकलव्य आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल जाधव, जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, जिल्हा संपर्कप्रमुख पिंटू नाना साळवे, सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदू शिंदे, लहुजी शक्ती सेनेचे ज्ञानेश्वर जगधने, बाळासाहेब जाधव, पोपट सोनवणे, पप्पू इंगळे यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले.
वक्त्यांनी आपल्या भाषणांतून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पोलिस प्रशासनाने निष्क्रियतेचे प्रदर्शन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. घटनेतील राहिलेले आरोपी तात्काळ अटक करावेत, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
मोर्चात जिल्हाभरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, समाजबांधव व आंबेडकरी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मोर्चा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोनेई येथून सुरू होऊन सोनेई पोलिस स्टेशनवर संपन्न झाला.
या निषेध मोर्चातून समाजाच्या न्याय व समानतेच्या मागणीचा पुन्हा एकदा बुलंद आवाज घुमला.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833






















