Homeताज्या बातम्यास्पर्धेत राडा! डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांना मारली लाथ

स्पर्धेत राडा! डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांना मारली लाथ

हिल्यानगर : ताकद आणि चपळाईचा खेळ म्हणून कुस्ती खेळाची ओळख आहे. परंतु याच कुस्ती खेळाला गालबोट लावण्याचे काम डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने केले. पंचाचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षे याने आधी पंचांची कॉलर पकडली आणि नंतत त्यांना लाथेने मारले.हा सर्व प्रकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य सरकारमधील चार कॅबिनेट मंत्र्यांसमोर घडला.वाडिया पार्कच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघ आणि अहिल्यानगर कुस्तीगिर संघाच्या सुंयक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ६७ वी अजिंक्य कुस्ती स्पर्धेचे अंतिम तीन सामना संपन्न होण्याआधीच पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील सामन्यादरम्यान तुफान राडा झाला.मैदानात नेमकं काय घडलं?पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात रोमहर्षक सामना सुरू असताना मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन् पंचांनी राक्षेला बाद घोषित करून सामना पृथ्वीराजने जिंकल्याचे घोषित केले. पृथ्वीराजच्या चाहत्यांनी एकच जल्लोषाला सुरुवात केली.रागाने लालबुंद झालेल्या शिवराज राक्षेने पंचाची कॉत्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचाची कॉलर पकडली. एवढ्यावरच न थांबता त्याने पंचांना लाथही मारली. शिवराज आणि पंचांमध्ये झटापट सुरू असल्याचे पाहून पोलिसांनी अखेर मध्यस्थी केली.माझी पाठ टेकलीच नव्हती, तुम्ही मला बाद कसे दिले?माझे दोन्ही खांदे टेकलेच नाहीत, माझी पाठ टेकलीच नव्हती, तुम्ही मला बाद कसे दिले? अशी विचारणा शिवराज राक्षे याने पंचांकडे केली. तुम्ही निर्णय देताना खेळ भावना दाखवली नाही, अशी तक्रार शिवराज राक्षे याने पंचांकडे केली. तसेच पंचांनी माझ्यावर अन्याय केल्याची भावना शिवराज राक्षेने बोलून दाखवली.महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील वादावर काय म्हणाला?असा प्रकार कधीच झाला नाही पण तो का झाला याचा देखील विचार केला पाहिजे. पंचांना निकाल देण्याची घाई करण्याची गरज नव्हती. शिवराज राक्षेला आक्षेप नोंदवण्याची संधीच मिळाली नाही. गोष्टी क्लिअर करून निकाल दिमिळाली नाही. गोष्टी क्लिअर करून निकाल दिला पाहिजे होता. व्हिडिओ पाहून दोन्ही खेळाडूंना गोष्टी समजावून मग निकाल दिला पाहिजे होता.नियमानुसार दोन्ही खांदे टेकले पाहिजे. व्हिडिओत तरी एकच खांदा टेकला आहे. ही घटना कशामुळे झाले हे कळत नाही, असे चंद्रहार पाटील म्हणाला स्पर्धेत राडा! डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांना मारली लाथ.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट २ कडून अटक

पुणे: पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या कडक सूचनांच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने एक महत्त्वाची कामगिरी...

राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६ जाहीर! ​ह.भ.प. संतदास उपाख्य श्री. पुरुषोत्तम...

आळंदी देवाची: अभंगकार ह.भ.प. संतदास उपाख्य श्री. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या साहित्यातील बहुमोल योगदानाची दखल घेऊन त्यांना "राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६"...

चंदुकाका सराफ ज्वेलर्सची १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

पुणे: प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे भासवून चंदुकाका सराफ, चंदननगर यांची फसवणूक करून १४,७८,७६०/- रुपये किमतीची १०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे घेऊन फरार झालेल्या मुख्य...

डिजीटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार: पुण्यातील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १० कोटी ७४ लाखांची फसवणूक;...

पुणे: डिजीटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पुणे सायबर...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: ३ गावठी अग्निशस्त्र व १ जिवंत काडतूसह तीन आरोपी...

घटनेची पार्श्वभूमी व कारवाई ​दिनांक १०/०८/२०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी धोत्रे, सचिन गाडे व सुभाष मोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत...

error: Content is protected !!