Homeताज्या बातम्याहिंजवडीत घरगुती वादातून पत्नीवर चाकू हल्ला; पती अटकेत

हिंजवडीत घरगुती वादातून पत्नीवर चाकू हल्ला; पती अटकेत

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २३ फेब्रुवारी २०२६ : हिंजवडी परिसरात घरगुती वादातून पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महेंद्र सोपान कांबळे (वय ३५, व्यवसाय सिक्युरिटी गार्ड, रा. किरण येवडे यांची रूम, येवडेवस्ती, लक्ष्मी चौक, हिंजवडी, पुणे) यास पोलिसांनी अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११४(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास किरण येवडे यांच्या रूममध्ये ही घटना घडली.

फिर्यादी महिला व त्यांचा पती महेंद्र कांबळे यांचा मुलगा प्रतीक याच्याशी शैक्षणिक बाबींवरून जोरदार वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी मध्ये पडली असता आरोपी पतीला राग अनावर झाला.

रागाच्या भरात आरोपीने घरातील लाकडी टेबलावर ठेवलेला भाजी कापण्याचा चाकू हातात घेऊन “तुला आता जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत फिर्यादी महिलेच्या पोटात चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. जखमी महिलेवर तातडीने उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस अटक केली. पुढील तपास पोलीस नाईक मोरे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

error: Content is protected !!