Homeताज्या बातम्यापुणे पोलिसांची मोठी कारवाई: 'मोका' गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन अट्टल...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ‘मोका’ गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन अट्टल आरोपींना गुन्हे शाखा युनिट-५ कडून बेड्या!

​पुणे, दिनांक २९ जून २०२६:
पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गंभीर ‘मोका’ (मकोका) गुन्ह्यातील आणि गेल्या ६ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या दोन पाहिजे/फरारी आरोपींना गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे.
​गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट ५ चे पथक फरार आरोपींचा शोध घेत होते. या दरम्यान, कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ०२/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम १०३(०१), १८९(२), १९०, १९१(२), ६१(२) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (मकोका) चे कलम ३(१)(i), ३(२), ३(४)) या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे यांना मिळाली.
​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश मधुकर भोसले हा कोंढवा बुद्रुक भागात तर दुसरा आरोपी अथर्व सुरेश म्हस्के हा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे लपून राहिला होता.
​पुणे आणि उमरगा (धाराशिव) येथून आरोपी अटकेत
खात्रीशीर माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने तातडीने हालचाली करत पुण्यातील टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक येथे सापळा रचला. या कारवाईत पोलिसांनी आकाश मधुकर भोसले (वय २६ वर्षे, रा. लेन नंबर ०२, टिळेकर नगर (अ), कोंढवा बुद्रुक, पुणे) याला ताब्यात घेतले.
​त्यानंतर, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आकाश भोसले याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता, त्याने दुसरा फरार आरोपी अथर्व म्हस्के याच्या ठावठिकाण्याबाबत माहिती दिली. या माहितीच्या आधारे पथकाने थेट धाराशिव गाठले आणि कुंभारपट्टी, उमरगा (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथून अथर्व सुरेश म्हस्के (वय २१ वर्षे, रा. गल्ली नंबर ०२, शिक्षक सोसायटी, एस.बी.आय. बँकेच्या मागे, कात्रज कोंढवा रोड, पुणे) याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
​कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक:
सदरची उल्लेखनीय आणि धडक कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​तसेच गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार व पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सूचनांनुसार, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे, अविनाश इंगळे, शहाजी काळे, अमर चव्हाण, परमेश्वर कदम, शशिकांत नाळे, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, सुधीर सोनवणे, जयदेव भोसले, नासेर देशमुख तसेच महिला पोलीस अंमलदार स्वाती तुपे, नेत्रिका अडसुळ व मयुरी पालवे यांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.
​या धडक कारवाईमुळे ६ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले असून, परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने केला दंड ​पुणे: मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा करून, शांततेस बाधा निर्माण करत...

आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा...

कोथरुड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

बनावट सोशल मीडिया खात्यांद्वारे तरुणास ब्लॅकमेल करून १.७७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आणि आत्महत्येस प्रवृत्त...

पुणे: खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंस्टाग्राम व टेलिग्रामवरील बनावट खात्यांच्या माध्यमातून तरुणाला खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून वारंवार ब्लॅकमेल केले. तसेच त्याच्याकडून १,७७,००० रुपयांची...

२० वर्षे पोलिसांना हुलकावणी, अखेर कायद्याच्या कचाट्यात! येरवडा पोलिसांची यशस्वी कारवाई

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी परळीतून केली अटक पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने गेल्या सुमारे २०...

जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; ३८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल...

​पुणे : जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि ओतूर पोलिसांनी...

error: Content is protected !!