पुणे:
पुणे शहरातील संघटित गुन्हेगारी आणि टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहेत. मागील ८ महिन्यांपासून समर्थ पोलीस स्टेशनच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आंदेकर टोळीतील एका सक्रिय रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने लोखंडी कोयत्यासह रंगेहात अटक केली आहे.
काय आहे सविस्तर बातमी?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर, सोमनाथ गायकवाड व सुरज ठोंबरे यांच्या टोळीतील सक्रिय अथवा असक्रिय सदस्य शहरात पुन्हा एखादा गंभीर गुन्हा करण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला या टोळ्यांमधील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक निगराणी ठेवण्याचे व तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार, दिनांक ०८/०६/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव, पोलीस उप-निरीक्षक राहुल मखरे आणि पोलीस अंमलदार हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार निलेश साबळे व हेमंत पेरणे यांना त्यांच्या खास बातमीदारांमार्फत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. ‘बंडू आंदेकर टोळीतील’ सक्रिय रेकॉर्डवरील आरोपी ओम नगरकर हा सोलापूर बाजार पीएमपीएमएल बस स्टॉपसमोरील कॅनॉल लगतच्या परिसरात आला असून, त्याच्याकडे घातक शस्त्रे आहेत व तो एखादा दखलपात्र गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
सापळा रचून आरोपीला केले जेरबंद:
माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने तातडीने सदर ठिकाणी धाव घेऊन अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचला. पोलिसांनी ओम गणेश नगरकर (वय २४ वर्षे, रा. ३२ म.न.पा. शाळेजवळ, यश रेसिडन्सीचे टेरेसवर, हडपसर गाव, पुणे; पूर्वी राहणार- ४०१ प्रतिभा कॉम्प्लेक्स, पॉवर हाऊस चौक, पुणे, सध्या हडपसर) याला जाळ्यात ओढून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून ५०० रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता आणि ५००० रुपये किमतीचा एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध लष्कर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १२८/२०२६ आर्म ॲक्ट ४(२५) व म.पो.अधि.क. ३७(१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच, सदर आरोपी हा समर्थ पोलीस स्टेशनकडील गु.र.नं. २२३/२०२६ भा.न्या.सं. कलम ३५३(२), १२५, ३(५) मधील गुन्ह्यात मागील ८ महिन्यांपासून पोलिसांना पाहिजे असलेला फरार आरोपी होता. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास लष्कर पोलीस स्टेशन करत आहे.
कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार:
सदरची धडाकेबाज कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, मा. अप्पर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि श्री. शैलेश संखे (सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक श्री. राहुल मखरे व पोलीस अंमलदार विनोद शिंदे, निलेश साबळे, हेमंत पेरणे, सिद्धेश्वर वाघमारे, सुहास डोंगरे, संदेश काकडे, अमित जमदाडे, मयुर भोसले, आणि अविनाश दळवी यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























