Homeताज्या बातम्याआरपीआयची ताकद ख्रिश्‍चन समाजालाही मिळावी, यासाठीच ख्रिश्‍चन आघाडीची स्थापना : बाळासाहेब जानराव

आरपीआयची ताकद ख्रिश्‍चन समाजालाही मिळावी, यासाठीच ख्रिश्‍चन आघाडीची स्थापना : बाळासाहेब जानराव

आरपीआयची ताकद ख्रिश्‍चन समाजालाही मिळावी, यासाठीच ख्रिश्‍चन आघाडीची स्थापना : बाळासाहेब जानराव

ख्रिश्‍चन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आरपीआय ख्रिश्‍चन आघाडी कटिबद्ध : ख्रिस्तोफर राजमनी

पुणे, : रिपब्लिकन पक्षाची (आरपीआय) विचारधारा आणि सामाजिक न्यायाची चळवळ ख्रिश्‍चन समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, तसेच समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी ख्रिश्‍चन आघाडीची स्थापना करण्यात आल्याची माहिती आरपीआयचे नेते बाळासाहेब जानराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेला आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, नगरसेविका हिमानी कांबळे, आरपीआय ख्रिश्‍चन आघाडीचे अध्यक्ष ख्रिस्तोफर राजमनी तसेच ख्रिश्‍चन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जानराव म्हणाले, संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आरपीआय सातत्याने संघर्ष करत आहे. या संघर्षात ख्रिश्‍चन समाजाचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि त्यांच्या प्रश्‍नांना संघटितपणे वाचा फुटावी, हा आघाडी स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समानता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांवर आधारित समाजनिर्मितीसाठी सर्व धर्मीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ख्रिश्‍चन आघाडीच्या माध्यमातून समाजातील युवक, महिला आणि विविध घटकांना नेतृत्वाची संधी मिळेल.
ते म्हणाले की, आजही ख्रिश्‍चन समाजातील मोठा वर्ग केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांपासून अनभिज्ञ आहे. माहितीच्या अभावामुळे पात्र असूनही अनेक नागरिक या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. ख्रिश्‍चन आघाडीच्या माध्यमातून समाजातील लोकांपर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहोचविणे, त्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे तसेच विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

ख्रिश्‍चन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आरपीआय ख्रिश्‍चन आघाडी कटिबद्ध : ख्रिस्तोफर राजमनी
ख्रिश्‍चन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी आरपीआय ख्रिश्‍चन आघाडी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन ख्रिस्तोफर राजमनी यांनी केले. समाजातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने ख्रिश्‍चन समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडण्यासाठी स्थापन केलेली आरपीआय ख्रिश्‍चन आघाडी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण बांधिलकीने कार्य करेल, अशी माहिती ख्रिश्‍चन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ख्रिस्टोफर राजमनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ख्रिस्तोफर राजमनी यांनी ख्रिश्‍चन आघाडीच्या पुणे शहर कार्यकारिणीची घोषणा केली. त्यामध्ये डार्थी रॉड्रिक्स थॉमस (महिला अध्यक्षा), येसू जेम्स दोरास्वामी (उपाध्यक्ष), विनोद चंडालिया (ब्रदर) (पुणे कॅम्प विभागाध्यक्ष), फ्रान्सिस सांतामात्यि (हडपसर विभागाध्यक्ष), ओलोसिल प्रगासम (सोलापूर बाजार प्रभाग शाखाध्यक्ष), स्टेनली फ्रान्सिस नेथन (वानवडी शाखाध्यक्ष), विनेश पिल्ले (घोरपडी-मुंडवा प्रभागाध्यक्ष), रॉकी अँथोनी (वानवडी बाजार शाखाध्यक्ष), राजन राजमनी (कोंढवा शाखाध्यक्ष) तसेच रॉबर्ट दास (वडगाव शेरी शाखाध्यक्ष) यांच्यावर विविध पदांची जबाबदारी सोपविण्यात आली.
———————–
आरपीआय की ताकत ख्रिश्चन समाज को भी मिले, इसी उद्देश्य से ख्रिश्चन आघाड़ी की स्थापना : बालासाहेब जानराव
ख्रिश्चन समाज के सर्वांगीण विकास के लिए आरपीआय ख्रिश्चन आघाड़ी प्रतिबद्ध : क्रिस्टोफर राजमनी

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) की विचारधारा और सामाजिक न्याय की मुहिम को ख्रिश्चन समाज तक प्रभावी रूप से पहुंचाने तथा समाज के विभिन्न वर्गों को एक मंच पर लाने के उद्देश्य से आरपीआय ख्रिश्चन आघाड़ी की स्थापना की गई है। यह जानकारी आरपीआय के प्रदेश सचिव बालासाहेब जानराव ने पत्रकार परिषद में दी।

पत्रकार परिषद में पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, नगरसेविका हिमानी कांबळे, आरपीआय ख्रिश्चन आघाड़ी के अध्यक्ष क्रिस्टोफर राजमनी सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे।

बालासाहेब जानराव ने कहा कि संविधानिक मूल्यों, सामाजिक समानता और वंचित वर्गों के अधिकारों के लिए आरपीआय लगातार संघर्ष कर रही है। इस संघर्ष में ख्रिश्चन समाज की भागीदारी बढ़े और उनके मुद्दों को संगठित रूप से आवाज मिले, यही आघाड़ी गठन का मुख्य उद्देश्य है। उन्होंने कहा कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा दिए गए समानता, बंधुत्व और न्याय के विचारों पर आधारित समाज निर्माण के लिए सभी धर्मों के लोगों का एकजुट होना आवश्यक है।

उन्होंने यह भी बताया कि आज भी ख्रिश्चन समाज का एक बड़ा वर्ग केंद्र और राज्य सरकार की विभिन्न जनकल्याणकारी योजनाओं से अनभिज्ञ है। जानकारी के अभाव में पात्र नागरिक भी योजनाओं का लाभ नहीं उठा पाते। ख्रिश्चन आघाड़ी के माध्यम से सरकारी योजनाओं की जानकारी समाज तक पहुंचाई जाएगी, आवश्यक मार्गदर्शन दिया जाएगा तथा संबंधित विभागों से समन्वय कर लाभ दिलाने का प्रयास किया जाएगा।

इस अवसर पर आरपीआय ख्रिश्चन आघाड़ी के अध्यक्ष क्रिस्टोफर राजमनी ने कहा कि ख्रिश्चन समाज के शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक और राजनीतिक सशक्तिकरण के लिए ख्रिश्चन आघाड़ी पूरी तरह प्रतिबद्ध है। युवाओं के लिए रोजगार के अवसर, विद्यार्थियों के लिए शैक्षणिक मार्गदर्शन और महिलाओं के सशक्तिकरण हेतु विभिन्न कार्यक्रम चलाए जाएंगे।

उन्होंने बताया कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) द्वारा स्थापित यह आघाड़ी ख्रिश्चन समाज को शासकीय योजनाओं से जोड़ने और उनके सर्वांगीण विकास के लिए पूर्ण निष्ठा से कार्य करेगी।

इस दौरान पुणे शहर ख्रिश्चन आघाड़ी की कार्यकारिणी की घोषणा भी की गई। डार्थी रॉड्रिक्स थॉमस को महिला अध्यक्षा, येसू जेम्स दोरास्वामी को उपाध्यक्ष, विनोद चंडालिया (ब्रदर) को पुणे कैंप विभागाध्यक्ष, फ्रांसिस सांतामात्यि को हडपसर विभागाध्यक्ष, ओलोसिल प्रगासम को सोलापुर बाजार प्रभाग शाखाध्यक्ष, स्टेनली फ्रांसिस नेथन को वानवडी शाखाध्यक्ष, विनेश पिल्ले को घोरपडी-मुंडवा प्रभागाध्यक्ष, रॉकी एंथोनी को वानवडी बाजार शाखाध्यक्ष, राजन राजमनी को कोंढवा शाखाध्यक्ष तथा रॉबर्ट दास को वडगांव शेरी शाखाध्यक्ष की जिम्मेदारी सौंपी गई।

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

दरेगाव: मुगाच्या शेंगा तोडताना विषारी सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

विशेष प्रतिनिधी / नायगाव नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना विषारी सर्पदंश झाल्यामुळे एका ४८ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा – खासदार रवींद्र चव्हाण...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा - खासदार रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे आक्रमक मागणी मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती...

पुणे पोलिसांची मोठी कामगिरी: समर्थ पोलीस ठाण्यातर्फे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त; जळगावच्या...

​पुणे: पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी सराईत...

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई: मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गांजा तस्करीतील...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा तस्करी करणाऱ्या आणि मागील तब्बल सहा महिन्यांपासून पोलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या एका...

error: Content is protected !!