Homeताज्या बातम्याकात्रजमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक ‘सदिच्छा समारंभ’ उत्साहात संपन्न

कात्रजमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक ‘सदिच्छा समारंभ’ उत्साहात संपन्न

कात्रजमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक ‘सदिच्छा समारंभ’ उत्साहात संपन्न

पुणे (शशिकांत पाटोळे) | दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६ महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था संचलित गगनगिरी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, संतोष नगर, कात्रज येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा “सदिच्छा समारंभ” अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.

दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मानसिक बळ, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या समारंभातून करण्यात आला.

प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. अल्पना वैद्य (Head, Department of Psychology, Symbiosis College of Arts & Commerce, Pune) यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळातील ताणतणाव कसा हाताळावा, अपयशाची भीती कशी दूर करावी आणि स्वतःवर विश्वास कसा ठेवावा याबाबत अत्यंत सोप्या व प्रभावी शब्दांत मार्गदर्शन केले.

“यश म्हणजे फक्त गुण नव्हे, तर तुमची जिद्द आणि प्रयत्न हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाला श्री. अर्जुन शिर्के सर मुख्याध्यापक हिरामण बनकर माध्यमिक विद्यालय, श्री कोळपकर सर वरिष्ठ शिक्षक हिरामण बनकर माध्यमिक विद्यालय, सौ. सुधा कांबळे मुख्याध्यापिका हुजूरपागा माध्यमिक विद्यालय कात्रज, प्रतिमाताई खांडेकर सेक्रेटरी भारत विकास परिषद, सक्सेस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संस्थापक श्री. सागर गवळी सर, श्री. नेवासकर सर संस्थापक मणिभद्र कॉम्प्युटर, संस्थेचे संस्थापक श्री. रतन माळी सर, संस्था अध्यक्षा सौ. स्मिताताई वाघ यांची विशेष उपस्थिती लाभली.

सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “शाळा म्हणजे आमच्यासाठी दुसरे घर आहे,” असे भावनिक शब्द अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी शुभेच्छा देताना त्यांच्यावर कायम आशीर्वाद आणि विश्वास असल्याचे सांगितले.

हसत-खेळत, आठवणींनी ओथंबलेल्या वातावरणात पार पडलेला हा सदिच्छा समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी कोरला जाईल, यात शंका नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षका सौ.पाटील मॅडम व इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी केले. आभार गगनगिरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी मानले. गगनगिरी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

error: Content is protected !!