Homeताज्या बातम्याकॅम्प परिसरातील कपड्यांचे दुकान फोडणारे दोन सराईत चोर गजाआड; २ लाख ८५...

कॅम्प परिसरातील कपड्यांचे दुकान फोडणारे दोन सराईत चोर गजाआड; २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे:
कॅम्प परिसरातील एम. जी. रोडवरील एका कपड्याच्या दुकानाची खिडकी उचकटून आत प्रवेश करत रोख रक्कम चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना लष्कर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीची रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेल्या दोन दुचाकी वाहनांसह एकूण २,८५,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
​अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
​१) अभिषेक राम कुमार (वय १९ वर्षे, रा. नाकोडा बिल्डिंग, इंडियन पेट्रोल पंपाच्या शेजारी, गंगाधाम, मार्केटयार्ड, पुणे)
२) सचिन प्रताप परिहार (वय २० वर्षे, रा. फ्लॅट नंबर १०२, बिबवेवाडी वट्टा, बिबवेवाडी, पुणे)
​घटनेची पार्श्वभूमी व चोरीचा प्रकार:
​मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्प येथील एम. जी. रोडवर फिर्यादी यांचे ‘इन्टस्टाईल मेन्स अँड किड्स’ (Instyle Mens & Kids) नावाचे कपड्यांचे दुकान आहे. दिनांक ३० जून २०२६ रोजी रात्री हे दुकान बंद असताना, आरोपींनी दुकानाच्या खिडकीचे ग्रील उचकटून आत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यानंतर दुकानाच्या कॅश काउंटरमध्ये ठेवलेली १,७०,०००/- रुपये (एक लाख सत्तर हजार) रोकड चोरून आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(४), ३३१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​अशी झाली अटक व मुद्देमाल जप्त:
​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून लष्कर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक तपास केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी वरील दोन्ही आरोपी निष्पन्न केले आणि त्यांचा माग काढत दिनांक १ जुलै २०२६ रोजी त्यांना बेड्या ठोकल्या.
​आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे:
​रोख रक्कम: १,६५,१००/- रुपये (एक लाख पपास हजार शंभर)
​वाहने: गुन्ह्यात वापरलेल्या १,२०,०००/- रुपये किमतीच्या दोन दुचाकी
​एकूण जप्त मुद्देमाल: २,८५,१००/- रुपये
​या गुन्ह्याचा पुढील तपास लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक राहुल घाडगे करीत आहेत.
​पोलीस पथक:
​सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ०५, पुणे शहर) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (लश्कर विभाग, पुणे) श्रीमती संगिता शिंदे अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​तसेच, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले यांच्या सुचनांनुसार, पोलीस उप-निरीक्षक राहुल घाडगे आणि तपास पथकाचे पोलीस अंमलदार अतुल मेंगे, संदीप उकिरडे, शरद मारणे, प्रवीण गायकवाड, विजय कुंभार, सागर हराळ, लोकेश कदम, अमोल कोडीलकर व पारसे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मृत्यूपासून अस्वस्थ’: केतन अग्रवाल यांच्या आजोबांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांचे निधन. पुणे बातम्या

लोहगड किल्ल्यावर ज्यांच्या मृत्यूची कथित हत्या म्हणून चौकशी केली जात आहे अशा पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या आजोबांचा घटनेच्या आठवड्यांनंतर मृत्यू झाला आहे....

केतन अग्रवालच्या हत्येतील ‘स्नॅपचॅट’ क्लू: सिया गोयलने चेतनला दोष दिल्याच्या काही दिवसांनंतर, तिच्या ‘मजकूर’मध्ये...

अग्रवालच्या कुटुंबियांनी उदयपूरमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या लग्नासाठी ट्रॅव्हल बुकिंग करण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांकडून आधार तपशील मागवायला सुरुवात केली असतानाच हा संदेश पाठवण्यात आला. पुणे:...

लोहक्रांती एक विचारधारा सामाजिक चळवळीच्या माध्यमातून लोहार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई...

कार्यकारी संपादक सागर लोहार लोहक्रांती एक विचारधारा सामाजिक चळवळीच्या माध्यमातून लोहार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे यशस्वी साखळी उपोषण लोहक्रांती एक विचारधारा सामाजिक...

खडकवासला सर्कल धरणात 24 तासांत 0.50 टीएमसी वाढ झाल्याने शहराची 10 दिवसांची पाण्याची गरज...

पुणे : खडकवासला सर्कलच्या चार धरणांमधील सामूहिक साठा शनिवारी 0.50 टीएमसीने वाढला - शहराची 10 दिवसांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेसा - कारण...

50 हून अधिक झाडे पडण्याची प्रकरणे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंगठ्यावर ठेवतात. पुणे बातम्या

शुक्रवारी रात्री जोरदार वाऱ्याने सेनापती बापट रोडवरील एक मोठे झाड उन्मळून उभ्या असलेल्या कारवर आदळून वाहनाचे नुकसान झाले. पुणे : अविरत पावसाने शनिवारी...

error: Content is protected !!