Homeताज्या बातम्याकोंढव्यात 400 KW सोलर प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; थ्री ज्वेल्सचा हरित ऊर्जेकडे मोठा...

कोंढव्यात 400 KW सोलर प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; थ्री ज्वेल्सचा हरित ऊर्जेकडे मोठा टप्पा

पुणे, कोंढवा (दि. 19 मार्च 2026):
पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा बचतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत कोंढवा परिसरातील थ्री ज्वेल्स अपार्टमेंट या गृहनिर्माण संकुलात 400 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडले. या प्रकल्पाचे उद्घाटन मा. आमदार योगेश आण्णा टिळेकर

(विधानपरिषद, महाराष्ट्र) यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 40 च्या नगरसेविका श्रीमती रंजना टिळेकर, सौ. अर्चना जगताप, सौ. वृषाली कामठे, सौ. पूजा कदम यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते राहुलअप्पा टिळेकर, तुषार कदम, श्रीकांत कामठे, उमेश दांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुमारे 1600 सदनिकांचे हे विशाल निवासी संकुल असून, येथे उभारण्यात आलेला 400 KW सौर ऊर्जा प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील निवासी प्रकल्पांपैकी सर्वात मोठ्यांपैकी एक मानला जात आहे. या प्रकल्पामुळे संकुलाच्या सामायिक वीज वापराचा मोठा हिस्सा सौर ऊर्जेतून भागवला जाणार असून, वीज खर्चात मोठी बचत होणार आहे. याशिवाय कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सोसायटीचे सचिव पांडुरंग भोले यांनी प्रास्ताविकातून प्रकल्पाचा संपूर्ण प्रवास उलगडला. अध्यक्ष सूर्यकांत खुरसे यांनी या सोलर प्रकल्पामागील उद्दिष्टे स्पष्ट करत सर्व सभासदांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी सुमारे 2.25 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, शासनाच्या धोरणानुसार अंदाजे 68 लाख रुपयांची सबसिडी अपेक्षित आहे. या प्रकल्पातून होणाऱ्या विजनिर्मितीमुळे दरवर्षी सुमारे 1 कोटी रुपयांची वीज बिल बचत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तांत्रिक बाजू मांडताना संजय मुळे यांनी प्रकल्प राबविताना आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली, तर रुपेश शहा यांनी स्ट्रक्चरल आव्हानांबद्दल सविस्तर विवेचन केले.
यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनी सौर ऊर्जेच्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकत, अशा उपक्रमांमुळे शाश्वत विकासाला चालना मिळते असे सांगितले. तसेच राज्य सरकार सौर ऊर्जेला प्रोत्साहन देत असल्याचे नमूद केले. त्यांनी प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सोसायटीचे पदाधिकारी, सोलर कमिटी सदस्य, तांत्रिक सल्लागार तसेच नेचर लाईट कंपनीचे सर्व कर्मचारी आणि भागीदार यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्ष प्रल्हाद दुधाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोंढवा परिसरातील प्रमुख गृहनिर्माण संकुलांपैकी एक असलेल्या थ्री ज्वेल्स अपार्टमेंटने उचललेले हे पाऊल इतर सोसायट्यांसाठीही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र खाजगी कंपन्यांच्या वार्षिक ऑडिट दरम्यान पॉश कायद्याचे पालन बंधनकारक करणार आहे. पुणे बातम्या

पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 (पॉश कायदा) ची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने...

वडगाव शेरी येथे पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाख ६५ हजारांचा बेकायदेशीर गुटखा आणि...

पुणे (विशेष प्रतिनिधी): अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. वडगाव शेरी परिसरातील एका गोदामावर छापा...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

error: Content is protected !!