Homeताज्या बातम्या"कोळवडी साष्टेतील मुरुम चोरीचा पर्दाफाश – ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी, अधिकार्‍यांचा...

“कोळवडी साष्टेतील मुरुम चोरीचा पर्दाफाश – ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी, अधिकार्‍यांचा दिशाभूल प्रयत्न उघड”

कोळवडी साठे गावातील रस्त्याच्या कामात मुरुम चोरीचा प्रकार – ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; प्रकरण वाघोली पोलिसांकडे वळवून दिशाभूल करण्याचा आरोप

गाव कोळवडी साठे (ता. हवेली, जि. पुणे) येथील गट क्रमांक ७२ मध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात शासकीय मुरुम चोरी, अनधिकृत उत्खनन आणि निधीचा गैरवापर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणाची पत्रकार आमिर मोहम्मद शेख (क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज) यांनी विविध पुराव्यांसह पोलिसांकडे तक्रार केली आहे.

सदर प्रकरणी ठेकेदार प्रतीक आव्हाळे व ऋषिकेश एकनाथ घुले यांनी शासनाच्या जमिनीवरून मुरुम चोरून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ग्रामपंचायत कोळवडी साठे यांचा दिनांक १४ जुलै २०२५ रोजीचा अहवाल, तसेच जिल्हा परिषद पुणे (बांधकाम विभाग – दक्षिण) यांच्याकडून देण्यात आलेले 18 जुलै 2025 चे अधिकृत पत्र यात मुरुम चोरी व अनियमिततेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

पत्रकार आमिर शेख यांनी या प्रकरणात IPC कलम 379 (चोरी), 420 (फसवणूक), 406 (विश्वासघात), 120(B) (कट रचना) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी लेखी मागणी पोलिसांकडे केली आहे.

🛑 प्रकरण वाघोली पोलीस ठाण्याकडे वळवून दिशाभूल?

सदर प्रकरणाचा कोणताही संबंध वाघोली पोलीस ठाण्याशी नसतानाही, संबंधित अधिकाऱ्यांनी मुद्दाम वाघोली पोलीस ठाण्याकडे तक्रार फॉरवर्ड करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या गैरवर्तणुकीमुळे कारवाईस उशीर होत असून, हा प्रकार संशयास्पद व प्रशासनाची जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्याचा आरोप पत्रकार आमिर शेख यांनी केला आहे.

📢 नागरिकांचा इशारा – आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन

या गंभीर प्रकरणात तहसीलदार, जिल्हा परिषद, खनिकर्म अधिकारी आणि पोलीस विभाग यांनी तातडीने संयुक्त तपास करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आठ दिवसांत कारवाई न झाल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

📌 प्रमुख मागण्या:

दोषी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा

महसूल व खनिकर्म विभागाच्या संयुक्त चौकशी समितीमार्फत सखोल तपास करावा

जिल्हा परिषद निधीतील गैरव्यवहाराबाबत आर्थिक तपास करावा

वाघोली पोलीस ठाण्याकडे फॉरवर्ड करत दिशाभूल केल्याबद्दल संबंधित अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करावी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विलंबाने, परंतु मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात. पुणे बातम्या

कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी | पुणे बातम्या

पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे बातम्या

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे:: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

error: Content is protected !!