पुणे:- पुणे मनपा ने सणस मैदानावर दिनांक आठ जून पासून खेळाडूंच्या सरावास बंदी घातली आहे, प्रशिक्षक, खेळाडू, आणि पालकांमध्ये यामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी च्या वतीने पुणे मनपा क्रीडा अधिकारी, डबल महाराष्ट्र केसरी, शिवराज राक्षे यांना भेटून निवेदन देण्यात आले. 
पुणे महानगरपालिकेने सन २००६ मध्ये कै.बाबुराव सणस मैदान विकसित केले आहे. मैदानावर ८ x ४०० मीटर आधुनिक पध्दतीचा आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक ट्रॅक विकसित करण्यात आला असून विविध प्रकारच्या ॲथलेटिक स्पर्धा याठिकाणी आयोजित केल्या जातात. यामध्ये १०० मी, ४०० मी, ८०० मी प्रकारातील धावण्याच्या स्पर्धा तसेच अडथळा शर्यती आयोजित करण्यात येतात. मैदानावर दोन ठिकाणी लांब उडीचे प्लॉट तयार केले असून या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा याठिकाणी आयोजित करण्यात येतात. उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, हातोडाफेक या स्पर्धांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कै.बाबुराव सणस मैदान येथे यापुर्वी २ वेळा एशियन ग्रॅडपिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . कै.बाबुराव सणस मैदान येथे दररोज ७००-८०० खेळाडू अॅथलेटिक्स खेळांचा सराव करीत असतात. या मैदानावर ललिता बाबर, भाग्यश्री शिर्के या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सराव केला आहे.
दिनांक १७ जून २०२५ च्या क्रीडा विभागाच्या पत्रात क्रीडा अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे एका प्रशिक्षकांनी 25 खेळाडूंना शिकवणे बंधनकारक आहे. पण ॲथलेटिक्स खेळामध्ये 72 खेळ प्रकार आहेत. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धा वयोगट सहा वर्षापासून ते खुल्या गटापर्यंत आहेत. मग 25 खेळाडू कशाप्रमाणे घ्यायचे आहेत हा प्रश्न क्रीडा विभागाला पडला नाही का ? 25 खेळाडू हे त्यांच्या खेळ प्रकारानुसार निवडायचे आहेत का उंचीनुसार, वजनानुसार, वयोगटांनुसार, खेळ प्रकरणानुसार 25 घ्यायचे आहेत का ?. क्रीडा क्षेत्रात आपल्याला खेळ वाढवायचा आहे पुण्यातून जास्तीत जास्त खेळाडू राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर तयार झाले पाहिजेत त्या उद्दिष्टाने खेळाडू तयार करण्याचे काम सणस मैदानावरती होत आहे. असंच कोणताही विचार न करता क्रीडा विभागाने खेळाडूंना, बाल खेळाडूंना गेले १५ दिवसांपासून मैदानापासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे हे अतिशय चुकीचे आहे, प्रशिक्षक, खेळाडू, पालक, स्थानिक नागरिक यांवर हा होणारा अन्याय आहे.
क्रीडा विभागाच्या पत्रानुसार मैदानातील सिंथेटिक ट्रॅकचा दर्जा तपासणी महत्वाचे आहे, लहान मुलांच्या आती वापराने सणस मैदानावरील ट्रॅक खराब झालाय आहे असे बोलणे उचित नाही. ठेकेदाराच्या, अधिकाऱ्यांच्या चुकीचे खापर या बालकांच्या डोक्यावरती फोडू नये. हा ट्रॅक बनवण्यामध्येच भ्रष्टाचार झाला आहे का हे पाहणे महत्त्वाचे वाटते कारण २ वर्षात जर ट्रॅक खराब झाला असेल तर नक्कीच काम निष्कृठ दर्जाचे झाले असेल त्यामुळे त्याची तत्पर चौकशी तज्ञ व्यक्तींच्या मार्फत व्हावी अशी मागणी शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी केली.
सध्या राज्यस्तरीय अनेक स्पर्धा चालू आहेत, आणि सराव बंद आहे हा खेळाडूंचा अपमान आहे, मैदानात अनेक सुविधांमध्ये त्रुटी आहेत महिला खेळाडूंना चेंजिंग रूम नाहीत, खेळाडू प्रशिक्षकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे त्यामुळे पालकांना, स्पर्धकांना त्रास होतो, आरोग्याच्या दृष्टिकोनातून टॉयलेट मध्ये लाईट पाण्याची सोय असणे महत्त्वाचे आहे, मैदानाचे मुख्य गेट बंद करून सारस बागेमधील दरवाज्याने पालकांना, मुलांना जावे लागते तिकडे बागेमुळे ट्रॅफिक, पार्किंग अश्या अनेक समस्या आहेत त्यामुळे मुख्य दरवाजा तत्पर सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी क्रीडा सेल चे अध्यक्ष डॉ मदन कोठुळे यांनी केली आहे.
लहान मुले जर खेळापासून वंचित राहिली तर मोबाईलचा नादाला लागून आरोग्याच्या समस्या मोठ्या वाढू शकतात, सणस मैदान मध्यवर्ती भागात असल्यामुळे पुण्यातील अनेक लहान मुले व मोठे खेळाडू येथे अथलेटिक्स खेळ प्रकार शिकण्यासाठी येत आहे.
पंधरा दिवसांपासून सराव बंद असल्याने दहा वर्षाखालील खेळाडूंच्या पालकांमध्ये खूपच नाराजगी आहे जर हा निर्णय लवकरात लवकर मागे नाही घेतला तर पालक, प्रशिक्षक, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडी च्या वतीने निवेदनात देण्यात आला.
यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी क्रीडा सेल चे अध्यक्ष डॉ मदन कोठुळे, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शंकर थोरवे, युवक काँग्रेस चे सरचिटणीस सागर धाडवे, शेखर पवार, राष्ट्रवादीचे संदीप काळे, शिवसैनिक निलेश वाघमारे, विजय जोरी, राजेश शेलार, विजय धाडवे, उपस्थित होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























