Homeताज्या बातम्यापुणे–सासवड परिसरात रोजा इफ्तारसाठी गेलेल्या १४ जणांवर हल्ला; आरोपींना अटक करण्याची मागणी...

पुणे–सासवड परिसरात रोजा इफ्तारसाठी गेलेल्या १४ जणांवर हल्ला; आरोपींना अटक करण्याची मागणी SDPI ची टीम, राष्ट्रीय दलित पँथर सेनेच्या अध्यक्षा सौ. आस्मा ताई, तसेच स्थानिक नगरसेवक काशीफ सैय्यद यांनी पोलीस प्रशासनाची भेट घेत

पुणे–सासवड परिसरात रोजा इफ्तारसाठी गेलेल्या १४ जणांवर हल्ला; आरोपींना अटक करण्याची मागणी

पुणे : पुणे जिल्ह्यातील सासवड हद्दीत रोजा इफ्तारसाठी गेलेल्या १४ जणांवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोजा इफ्तारसाठी काही जण एकत्र आले असताना काही अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.
या घटनेच्या निषेधार्थ SDPI ची टीम, राष्ट्रीय दलित पँथर सेनेच्या अध्यक्षा सौ. आस्मा ताई, तसेच स्थानिक नगरसेवक काशीफ सैय्यद यांनी पोलीस प्रशासनाची भेट घेत घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना जाब विचारत, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून पोलिसांनी त्वरीत कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. गौर साहेब यांनी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करत घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित आरोपींना २४ तासांच्या आत अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात. पुणे बातम्या

पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी. पुणे बातम्या

पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे. पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते. पुणे बातम्या

चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

पुण्याच्या काही भागांत कमी पावसानंतर आठवडाभरात पावसाची नोंद झाली. पुणे बातम्या

कोथरूडमध्ये रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पुणे : मान्सूनच्या जवळपास आठवडाभराच्या मंद गतीनंतर पुणे आणि आसपासच्या भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली,...

केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा ‘सिंगापूर’मध्ये पार्टी करतानाचा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर...

पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा आणखी एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती सिंगापूरमध्ये एका खाजगी पार्टीत...

error: Content is protected !!