बिबट्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तनपुरे यांची विशेष मोहीम
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सह संपादक शिवाजी दवणे 9730170965
महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचा प्रचंड प्रमाणात संख्या वाढल्याने ग्रामीण भागात अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शेतकऱ्यांचे रोजचे जीवन अक्षरशा विस्कळीत झाली असून लहान मुलांना शाळेत पाठविणे धोक्याचे झालेली आहे. या गंभीर परिस्थितीवर उत्तम उपाययोजना करण्यासाठी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ¹गट) नेते प्राजक्ता तनपुरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्याची विशेष मोहीम सुरू केलेली आहे. या उत्तम मोहिमेचा शुभारंभ राहुरी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये करण्यात आला. यावेळी तनपुरे म्हणाले आज या जिल्ह्यातच नव्हे तर त्या महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांची जीवन जगणे अवघड झालेली आहे. रात्री शेतात जाण्याची हिंमत होत नाही. दुर्गम ग्रामीण भागात लहान मुलांवर कधी हल्ला होईल याची सतत भीती सर्वांना वाटत आहे. बिबट्यांची संख्या वाढण्यामागे जंगलापेक्षा मानवी वस्तीतील सुरक्षित वातावरण कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गात बिबट्यांची सर्व पिल्ले जगत नाही. मात्र शेती शिवारात सुरक्षितता मिळाल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुढील चार-पाच वर्षात ही संख्या दुप्पट तिप्पट झाली तर परिस्थिती आणखीन बाहेर होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर बिबट्यांची संख्या नियंत्रण आणण्यासाठी नसबंदी किंवा इतर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. यासाठी छापण्यात आली असून कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रत्येक शेतकऱ्याची सही व मोबाईल क्रमांक घेऊन ही पत्रे थेट पंतप्रधान पर्यंत पोहोचणार आहेत. या पत्र मोहिमेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याची भावना पंतप्रधान पर्यंत पोचली जाणार असून, ही केवळ सुरुवात आहे असे तनपुरे म्हणाले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























